

पुणे (Pune) :- शिवनेरी गडाच्या पायथ्याशी एक धक्कादायक प्रकार घडला. शिवनेरीच्या पहिल्या पायरीला अभिवादन करून अमोल कोल्हे आणि जयंत पाटील यांनी शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात केली. जयंत पाटील आणि अमोल कोल्हे हे शेकडो कार्यकर्त्यांसह उपस्थित होते. दरम्यान येथे एक विचित्र अपघात घडला. अमोल कोल्हे (Amol kolhe) आणि जयंत पाटील ज्या क्रेनच्या ट्रॉलीवर उभे होते, ती ट्रॉली कलंडली.राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि खासदार अमोल कोल्हे थोडक्यात बचावलेयत.शिवस्वराज्या यात्रा सुरू झालीय.यावेळी शिवनेरीच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातल्यानंतर क्रेनची ट्रॉली एका बाजूला कलंडली.यावेळी क्रेनच्या ट्रॉलीत जयंत पाटील, अमोल कोल्हे, मेहबुब शेख, रोहिणी खडसे होत्या. चौघेही एका बाजूला कलंडले.सुदैवाने यात कोणाला दुखापत झाली नसून सर्व जण सुखरुप आहेत
शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्याच दिवशी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला. क्रेनच्या सहाय्याने पुतळ्याला पुष्पहार घालून खाली येत असताना क्रेनची ट्रॉलीमध्ये बिघाड झाला. यामुळे जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहिणी खडसे, मेहबुब शेख थोडक्यात बचावलेत, सुदैवाने यात कोणाला दुखापत झाली नसून सर्व जण थोडक्यात बचावले आहेत. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
पुष्पहार घालून खाली उतरताना अर्ध्यावर पोहचल्यावर क्रेन तुटली. जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहिणी खडसे, मेहबुब शेख खाली पडण्याची शक्यता होती. सुदैवाने, कुणालाही दुखापत झाली नाही पण यात्रेच्या सुरुवातीलाच ही घटना घडल्याने उपस्थितांमध्ये खळबळ उडाली.