अमित शहा आज नांदेडमध्ये, जाहीरसभा घेणार

0

नांदेड- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नांदेडमध्ये येणार आहेत. त्यांची नांदेडमध्ये जाहीरसभा होणार आहे. नांदेडमध्ये भाजपच्या महिनाभर चालणाऱ्या कार्यक्रमांची सुरुवात शहा यांच्या रॅलीने होणार आहे. यासोबतच मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ते कार्यकर्त्यांच्या बैठकाही घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अमित शाह नांदेड येथे गुरुद्वारा समितीच्या सदस्यांचीही बैठक घेणार असल्याची माहित आहे.
नांदेड शहरातील अबचलनगर मैदानावर आज भाजपची जाहीर सभा होणार आहे.अमित शहा यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. या सभेच्या अनुषंगाने पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर गेल्या आठवड्याभरापासून भाजपकडून या सभेची जोरदार तयारी सुरु आहे. भाजपचे स्थानिक नेते अक्षरशः सभेच्या ठिकाणी तळ ठोकून आहे.