अंबादास दानवे यांचे निलंबन मागे, उद्यापासून कामकाजात

0

 

 

मुंबई (Mumbai) दि ४– विधानपरिषद सभागृहात असभ्य भाषा वापरल्या प्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Opposition leader Ambadas Danve) यांचं निलंबन पाच ऐवजी तीन दिवस करण्याचा ठराव आज विधानपरिषदेत बहुमतानं संमत करण्यात आला .दोन तारखेला दानवे यांना सभागृहातून निलंबित करण्यात आलं होतं, तीन दिवसांचे निलंबन झाल्यानं दानवे उद्यापासून कामकाजात सहभागी होऊ शकतील.

अंबादास दानवे यांनी पत्र पाठवून झालेल्या प्रकाराविषयी व्यक्त केलेली दिलगिरी विचारात घेता त्यांचं निलंबन कमी करण्याचा प्रस्ताव मांडत असल्याचं संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबतचा ठराव आज सभागृहात मांडताना सांगितलं.

यापूर्वी ज्या भाजपाचे प्रसाद लाड यांच्याविषयी असभ्य भाषा वापरण्यात आली होती, त्या लाड यांनीच हे प्रकरण अधिक ताणण्याची इच्छा नसल्याचं सांगितलं. राज्याचं हित सर्वोपरी ठेऊन सभागृहाचा निर्णय मान्य असेल अशी भूमिका यांनी मांडली होती, त्यानंतर निलंबन कालावधी कमी करण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला.