अंबादास दानवे यांनी जखमींची केली विचारपूस,आरटीओवर ताशेरे

0

 

छत्रपती संभाजीनगर : आज झालेल्या भीषण अपघाताला परिवहन विभाग जबाबदार आहे.टेम्पो ट्रॅव्हलची कॅपॅसिटी 17 सीटरची आहे आणि त्यात 38 -40 जण प्रवास करीत होते. समृद्धी महामार्गावर प्रवेश करताना प्रत्येक ठिकाणी टोल आहे .त्या ठिकाणी वाहनांची तपासणी झाली पाहिजे. दोन महिन्यापूर्वी घटना घडली होती तेव्हा थोडं फार कडक झालं होतं तीस चाळीस जण जर जात असतील तर हा निष्काळजीपणा आहे असा आरोप विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

या ठिकाणाहून ट्रक जात असेल आणि त्याला जर रस्त्याच्या बाजूला थांबवले जात नसेल तर अपघात घडणारच, आरटीओच्या पोलिसांनी या गोष्टी करणं सर्व चुकीचे आहे समृद्धी महामार्गावर अशा गाड्या थांबणे चुकीचे आहे. हप्तेखोरीसाठी आरटीओ पोलीस वाहने थांबवतात, याबाबत मी मुख्यमंत्र्याशी चर्चा करेल जर समृद्धी महामार्गाचा वापर हप्ते खोरीसाठी आरटीओ करत असेल तर चुकीची बाब आहे. रात्री जे आरटीओ या ठिकाणी होते त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कारण ते या घटनेला जबाबदार आहेत.टोल नाक्यावर एंट्री करताना तपासणी व्हावी कारण की महामार्ग आहे. या समृद्धी महामार्गावर वाहने गती घेणारच आणि जर चिरीमरी हफ्ते खोरीसाठी जर वाहने थांबवली जात असतील तर अपघात होणारच,लोकांचा जीव काही स्वस्त झालेला नाही आणि या अशा घटनेचा निषेध किती दिवस करायचा ?
असा सवाल अंबादास दानवे यांनी केला आहे.