Home political या मतदार संघात मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत

या मतदार संघात मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत

0

अमरावती(Amaravati):-मंगळवारी रवी राणांनी बडनेरा मतदारसंघामध्ये आपली महायुतीमधून उमेदवारी जाहीर करताना मोठे वक्तव्य करीत मी बडनेरा मतदार संघामध्ये युवा स्वाभिमान पक्षाकडून लढणार असून माझे चिन्ह पाना असल्याचे ते म्हणाले होते. मात्र त्यांच्या वक्त्यव्यावर भाजप नेते तुषार भारतीय यांनी आपली प्रतिक्रिया देत बडनेरा मतदार संघात सुद्धा मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे संकेत दिले आहे.

ज्या ठिकाणी तिन्ही पक्षाचे उमेदवार मजबूत आहेत त्या ठिकाणी उमेदवाराला थांबवल्याने पक्षाचे मोठे नुकसान होते. भाजपने ज्या पण 25 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा जो प्रस्ताव दिला आहे तो अजित पवारांनी सुद्धा स्वीकारायला हवा. अजित पवार यांच्या उमेदवारांमध्ये जेवढा दम आहे तेवढे उमेदवार त्यांनी निवडणुकीमध्ये उतरवावेत. भाजपचे जे मजबूत उमेदवार आहेत ते उतरतील. दमदार उमेदवाराला थांबवणे म्हणजे महायुतीचे नुकसान आहे, असे राणा म्हणाले. त्यावर भारतीय यांनी हि भाजपा बडनेरा मतदार संघात मैत्रीपूर्व लढत लढण्याच्या तयारीत असल्याचे सांगतिले.

भाजपने ज्या पंचवीस जागा मागितल्या आहेत त्यामध्ये अमरावतीसह बडनेरा मतदारसंघआहे. बडनेरा(Badnera) मतदारसंघामध्ये महायुतीचा मी उमेदवार आहे. मला देवेंद्र फडणवीस यांनी हिरवी झेंडी दिली असल्याचे राणा सांगत जरी असले तरी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बडनेरा मतदार संघात मैत्रीपूर्ण लढत घ्यावी अशी मागणी केली आहे.आणि भाजपा या वर गांभीर्याने विचार करीत असल्याचे काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता बडनेरा मतदार संघात महायुतीचे उमेदवार म्हणून रवी राणा राहणार कि भाजप मैत्रीपूर्ण लढत करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.