5 % राखीव निधी मधून होणारा सर्वांगीण विकास

0

नागपूर(Nagpur) १ जुलै :- नागपूर महानगरपालिकेद्वारे वर्ष 2024-25 करीता महिला व बाल कल्याणासाठीच्या योजना राबविण्याकरीता 5% निधी म्हणजेच रुपये 12.50 कोटी राखीव ठेवण्याची तरतुद करण्यात आली आहे. त्यामध्ये खालील योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे:-

  1. शिवणयंत्र वाटप योजना                6. मुलींना शाळेकरीता उपस्थिती भत्ता व अर्थसहाय्य योजना
  2. महिला उद्योजिका मेळावा             7. महिलांकरीता समुपदेशन केंद्र
  3. सॅनेटरी नॅपकीन वाटप योजना        8. महिला/बालक बस प्रवासी पास उपलब्ध करुन देणे
  4. फुड स्टॉल वाटप योजना               9. विज्ञान प्रयोगशाळा नुतनीकरण (सायन्स लॅब) नुतनीकरण
  5. महिलांकरीता शहरी बेघर निवारा    10. बालवाडी – पोषक आहार

वरील योजनांच्या माध्यमातुन महिला बचत गटातील महिलांना त्यांचे उत्पन्न कसे वाढविता येईल याचे नियोजन करण्यात येत आहे व वैयक्तिक स्तरावर महिलांना स्वावलंबी बनविण्याकरीता प्रयत्न सुरु आहेत. महिला उद्योजिका सण/उत्सवाच्या दिवशी घेण्याचा व प्रत्येक मनपा कार्यालयात फुड स्टॉल या माध्यमातुन महिलांकरीता चांगले व सुसज्ज व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.

नाविन्यपुर्ण योजनांमध्ये नागपूर पोलीस व मनपा मार्फत महिलांसाठी Helpline व समुपदेशन केंद्र सुरु करण्याचे विचाराधीन आहे. तसेच मुलींचा शैक्षणिक स्तर उंचाविण्यासाठी मनपा शाळेतील मुलींची उपस्थिती 80% पेक्षा जास्त असली तर रु. 4000/- प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार आहे. शाळेतील मुलींना सायकल वाटप व महिला व बालकांचे मनपा बस वाहतुकीमध्ये प्रवासी पास दिले जाणार आहे. मनपातील बालवाडयांमध्ये शिकणारे गरजु मुले यांना पोषकआहार ची व्यवस्था मनपा मार्फत मा. आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी (भा.प्र.से.) यांचे मार्गदर्शनात प्रथमत: करण्यात येत आहे.

या शिवाय दुर्लभ आजाराने ग्रासलेल्या महिलांना अर्थसहाय्य, महिला खेळाडुंना अर्थसहाय्य व मुली/महिला करीता स्वयं रक्षणासाठी कराटे प्रशिक्षणसुध्दा येत्या दिवसांमध्ये योजिले आहे.

उपरोक्त योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यींना घ्यावा असे आवाहन मा. आयुक्त यांचे मार्फत करण्यात येत आहे.