सर्वपक्षीय नेत्यांना मुंबईतील बैठकीसाठी बोलवावे; ओबीसी आंदोलन समितीची मागणी

0

 

नागपूर – राज्य सरकारच्या वतीने बोलावण्यात आलेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांना बोलावण्यात यावे या मागणीचे निवेदन नागपुरात सर्व शाखीय कुणबी ओबीसी आंदोलन कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. सरकारने बोलावण्यात आलेल्या अनेक प्रतिनिधीमध्ये फक्त एकाच पक्षाच्या लोकांना प्रतिनिधित्व देण्यात आलं. त्यामुळे ओबीसी आंदोलन सुरू असताना सर्वपक्षीय लोकांनी पाठिंबा दिला. मंडपाला भेटी दिल्या, आंदोलनाला बळ दिले, त्या सर्वपक्षीय नेत्यांना बोलावून बैठकीत आमच्या ओबीसीच्या मागण्या ताकदीने मांडण्यासाठी सरकारने त्यांनाही आमंत्रण द्यावे, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. या संदर्भात आज सायंकाळपर्यंत जिल्हाधिकारी हे निवेदन मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचून त्या संदर्भातली माहिती आम्हाला देणार असून त्यानंतर आम्ही सर्व शाखीय कुणबी आंदोलन समितीच्या वतीने बैठक घेऊन 29 तारखेला होणाऱ्या बैठकीसाठी जायचं की नाही? यासंदर्भात निर्णय घेऊ अशी माहिती देण्यात आली आहे. कुणबी ओबीसी आंदोलन कृती समितीच्या वतीने राजेश काकडे, अवंतिका लेकुरवाळे यांनी दिली.