अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेची प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल 

0

सिकलसेलच्या रुग्णांना मोफत औषधोपचार मिळणार एम्स चे अध्यक्ष विकास महात्मे यांची माहिती 

 वर्षभरापासून बंद पडलेले बोनमॅरो ट्रान्सप्लांट सुरु करणार 

एम्स चे चेअरमन विकास महात्मे यांची माहिती

 

नागपूर(Nagpur) ३ जुलै :-  नागपूर मिहानमधील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था(All India Institute of Medical Sciences) म्हणजेच एम्स ची वाटचाल प्रगतीच्या दिशेने वेगाने रू आहे . एम्स चे नवनियुक्त चेअरमन माजी खासदार डॉक्टर विकास महात्मे यांनी शनिवारी प्रेस क्लब मध्ये आयोजित पत्रपरिषदेत हि माहिती दिली , . डॉ . महात्मे यांची एम्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल गुरुवारी पत्रकार क्लब ऑफ नागपूरच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते याप्रसंगी ‘ एम्स’चे संचालक डॉ . पी . पी . जोशी , भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ . गिरीष चरडे , पत्रकार क्लब ऑफ नागपूरचे अध्यक्ष प्रदीप  मैत्र   आणि सचिव ब्रह्माशंकर त्रिपाठी प्रामुख्याने उपस्थित होते  , पत्रपरिषदेत माहिती देताना एम्सचे अध्यक्ष डॉ . विकास महात्मे , यांनी सांगितले कि २०२० पासून मेडिकल ऑन्कोलॉजिस्टचे पद रिक्त आहे त्यासाठी जाहिरात देखील काढण्यात आली आहे मात्र आतापर्यंत हे पद भरता आले नाही मात्र लवकरच यावर तोडगा देखील काढण्यात येईल असा विश्वास देखील डॉक्टर महात्मे यांनी दर्शविला एम्स रुग्णालयात सध्या नर्सची ५० टक्के पदे रिक्त असल्याची माहिति डॉ . पी . पी . जोशी ,यांनी दिली , त्यांनी संगीतकले कि  एम्समध्ये ८२० बेड  आहे त्यात्यानुसार १ हजार नर्सिंग च्या  स्टाफ .ची  गरज होती मात्र  परंतरीदेखील ५२० जागा भरण्यात आल्या आहेत . लवकरच शिल्लक जागा देखील भरल्या जातील . मागील वर्षभरापासून बंद पडलेल्या बोनमेरो ट्रान्सप्लांट युनिट च्या प्रश्नावर उत्तर देताना डॉ महात्मे यांनी सांगितले कि  मधल्या काळात  डॉक्टर सोडून  गेले होते तरीदेखील वर्षभरात ५ रुणावर ट्रान्सप्लांट झाले आहेत  आता नवीन डॉक्टर्स ची भरती झाली आहे त्यामुळे हे युनिट देखील लवकर सुरु होईल  असे ते म्हणाले  सिकलसेलच्या रुग्णांना औषधोपचारासाठी एम्समध्ये पैसे लागतात यावर उत्तर देताना डॉ . महात्मे म्हणाले लवकरच सिकलसेलच्या रुग्णांना औषधोपचार मोफत करून असा विश्वास देखील दर्शविला . भविष्यात  रुग्णांना  बेड साठी धावाधाव करायची गरज पडणार नाही यासाठी शहरातील ३ मोठ्या शासकीय रुग्णालयात एकमेकांशी कनेक्टिव्हिटी वाढविण्याबाबत देखील काम सुरु असल्याची माहिती देखील  डॉ . पी . पी . जोशी यांनी यावेळी दिली ,