HDFC च्या लाखो ग्राहकांसाठी अलर्ट जारी!

0

जगातील अनेक देशांमध्ये यूपीआय पेमेंटचा वापर केला जात आहे. दरम्यान, देशातील सर्वात मोठी खासगी बँक, एचडीएफसी बँकेने यूपीआय व्यवहारांबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

एचडीएफसी बँकेने आपल्या लाखो ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, सिस्टीम मेंटेनन्समुळे यूपीआय सेवा 8 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 12 ते 3 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.

याशिवाय या डाऊनटाईम कालावधीदरम्यान एचडीएफसी बँकेच्या करंट आणि सेव्हिंग अकाउंटसोबतच रुपे क्रेडिट कार्डच्या माध्यमातूनही आर्थिक आणि बिगर आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत.

त्यामुळे आता एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांनी 8 फेब्रुवारीच्या रात्री उशिरा कोणताही व्यवहार करण्याचे टाळावे.