

नागपूर(Nagpur), 6 जुलै :- विष्णूजी की रसोई, अक्षरायन आणि भूमीपात्र यांच्या संयुक्तवतीने ‘अक्षर पंढरी – अभंगांची अक्षरदिंडी’ हा कार्यक्रम रविवार, 7 जुलै 2024 रोजी सकाळी 9 वाजता विष्णूजी की रसाई, बजाज नगर येथे आयोजित करण्यात आला आहे. अक्षर,चित्र, कविता आणि अभंगांच्या रुपातील विठुमाऊलीचे ‘अक्षररुपी’ दर्शन देणा-या या कार्यक्रमाचा वनराई फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, प्रसिद्ध व्हिज्युअल आर्टीस्ट विवेक रानडे व प्रसिद्ध लेखिका, दिग्दर्शिका मनिषा कोरडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश मर्यादित आहे. कार्यक्रमास येताना केशरी किंवा पांढरा वेश परिधान करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.