विठुमाऊलीच्‍या दर्शनाला निघाले वारकरी

0

कॅलिग्राफी, ड्रॉइंग, कविता, अभंगांची अनोखी दिंडी

 

नागपूर(Nagpur), 2 जुलै :- पंढरपूरची वारी म्‍हणजे भक्‍तीचा सोहळा. टाळ, चिपळ्या आणि मृदूंगाच्‍या तालावर अभंगांमध्‍ये तल्‍लीन होत विठुमाऊलीच्‍या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघालेल्‍या दिंडीत सहभागी होणे म्‍हणजे आनंद सोहळा. हाच आनंद सोहळा कॅलिग्राफी, ड्रॉइंग, कविता, अभंग अशा अक्षररुपी दिंडींच्‍या स्‍वरूपात रविवार 7 जुलै 2024 रोजी अनुभवता येणार आहे.

विष्‍णूजी की रसोई, अक्षरायन आणि भूमीपात्र यांच्‍या संयुक्‍तवतीने ‘अक्षर पंढरी – अभंगांची अक्षरदिंडी’ हा कार्यक्रम सकाळी 9 वाजता विष्‍णूजी की रसाई, बजाज नगर येथे आयोजित करण्‍यात आला असून अक्षर,चित्र, कविता आणि अभंगांच्‍या रुपातील विठुमाऊलीचे ‘अक्षररुपी’ दर्शन रसिक भक्‍तांना होणार आहे. कॅलिग्राफी, ड्रॉईंगसाठी लागणारे साहित्‍य आयोजकांकडून दिले जाईल.

या कार्यक्रमासाठी प्रवेश मर्यादित आहे. उपस्‍थ‍ितांसाठी अल्‍पोपहाराची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. कार्यक्रमास येताना केशरी किंवा पांढरा वेश परिधान करावा. इच्‍छूकांनी 9822565768 व 9822566883 या क्रमांकावर आपली नावे नोंदवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.