अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक रद्द

0

 

नागपूर (Nagpur)- लोकसभा निवडणुकांसोबतच विदर्भातील अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली असली तरी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ती रद्द ठरवली आहे. अकोला येथील अनिल तुपे यांनी दाखल केलेली याचिका मंजूर करीत हा निर्णय देण्यात आला. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार गोवर्धन शर्मा यांचे 3 नोव्हेंबर 2023 रोजी निधन झाले. तेव्हापासून या विधानसभा मतदारसंघाचे आमदारपद रिक्त आहे.

या ठिकाणी पोटनिवडणूक घेणे अपेक्षित असल्याने लोकसभा निवडणुकीसोबत या विधानसभा मतदारसंघाची निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केली. मात्र विधानसभा निवडणुकांना एक वर्षपेक्षा कमी काळ राहिलेला असताना पोटनिवडणूक घेणे संयुक्तिक नाही. नवनिर्वाचित आमदार म्हणून वर्षभराचा कालावधी मिळत असल्यास पोटनिवडणूक घेतली जाते असा नियम आहे. या संदर्भात उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे निकालाच देखील संदर्भ देण्यात आला.अखेर पुढील सहा महिन्यात विधानसभेच्या निवडणुका असल्याने ही निवडणूक रद्द करण्यात यावी अशी विनंती याचिकेत करण्यात आली. न्यायमूर्ती अनिल किल्लोर आणि न्यायमूर्ती एम एस जवलकर यांनी दोन्ही पक्षाची बाजू एकून ही निवडणूक रद्द केली. याचिकाकर्त्याकडून ऍड अक्षय नाईक, जुगविजयय गांधी, राज्य सरकारकडून मुख्य सरकारी वकील देवेंद्र चव्हाण यांनी बाजू मांडली.