
अकोला AKOLA – अकोला शहरातल्या कैलास टेकडी परिसरात राहणाऱ्या एका 11 वर्षीय मुलीवर शेजारीच राहणाऱ्या मुलाने अत्याचार केला असून अनेक दिवसांपासून चाकूच्या धाकावर आणि परिवाराला जीवे मारण्याच्या धमक्या देत तो अत्याचार करीत होता.
यावरच हा मुलगा थांबला नसून या चिमुकलीच्या अंगावर सिगारेटचे चटके देऊन तिचे केसही कापले आहेत. या घटनेनंतर समाजात संताप व्यक्त केला जात असून या युवकाला 17 नोव्हेंबरला खदान पोलिसांनी अटक केली आहे. कलम 363, 376, 354, 354-B, 323, 324, 506,4,8 नुसार खदान अत्याचार व पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला कडक शिक्षा देण्याची मागणी पीडितेच्या वडिलांनी केली असून आरोपीला 3 दिवसांचा पीसीआर दिला आहे. या प्रकरणात पोलीस आरोपीचा पुन्हा पीसीआर मागणार असून या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याची माहिती उपजिल्हा पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांनी दिली. या मुलीला बालसुधार गृहामध्ये पाठवण्यात आले आहे. तिचे मेडिकलचे रिपोर्ट आल्यानंतरच तिच्या हातावर असलेल्या जखमांबद्दल खुलासा होणार आहे.