
मुंबई (Mumbai )-अजित पवार यांच्या बंडखोरीची आपल्याला पुसटशीही कल्पना आली नाही, असा दावा राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळेंनी केलाय. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, रविवारी मी बराच वेळ अजितदादांच्या निवासस्थानी होते. आमच्यामध्ये सविस्तर चर्चाही झाली. पण दादांच्या मनात काय चाललेय याबद्दल मला काही माहिती नव्हते. काही वेळाने आमदार देवगिरी बंगल्यावर पोहोचायला सुरुवात झाली व मी निघाल्यावर अजितदादा आणि त्यांचे समर्थक राज भवनावर पोहोचले, असा दावा सुळे यांनी केला आहे. (NCP Working President Supriya Sule on NCP Crisis)
सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की, रविवारी देवगिरीवर गेले तेव्हा अजित पवारांना भेटायला अनेक आमदार आले होते. ते प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडणुकीससंदर्भात चर्चा करण्यासाठी आले असावेत, असे मला वाटले. त्यांनी काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली होती व त्यासाठी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देण्याची तयारीही दाखवली होती. मात्र, मी देवगिरी वरून निघाल्यावर अजित पवार राज भवनाकडे गेल्याची माहिती मिळाली, असेही त्या म्हणाल्या.