अजित पवारांची निवडणूक आयोगाकडे याचिका, ४० आमदारांच्या सह्या

0

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर गटाचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल झाली असून या याचिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व निवडणूक चिन्ह घड्याळ या दोन्ही गोष्टींवर दावा करण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्यापूर्वी दोन दिवस अगोदरच ही याचिका निवडणूक आयोगाकडे सादर झाल्याची माहिती असून त्यावर तब्बल ४० आमदारांच्या स्वाक्षऱ्या असल्याची माहिती आहे.
दरम्यान, आमची बाजू ऐकल्याशिवाय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणी शरद पवारांच्या गटाकडून कॅव्हेटद्वारे निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार? हे महत्त्वाचे ठरणार आहे.