फडणवीसांच्या भावनांचा अजित पवार आदर करतील-बावनकुळे

0

नागपूर- नवाब मलिक यांच्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रातून व्यक्त केलेल्या भावनांचा, राज्यातील १४ कोटी जनतेच्या भावनांचा उपमुख्यमंत्री अजित पवार हे आदर करतील, अशी अपेक्षा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज व्यक्त केली. (BJP State President Chandrashekhar Bawankule On Nawab Malik Issue)
विधान भवन परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी नवाब मलिक प्रकरणावर भाजपची भूमिका मांडली. काल फडणवीस यांनी पत्रातून घेतलेल्या भूमिकेशी महाराष्ट्र भाजप पूर्णपणे सहमत असल्याचे सांगताना बावनकुळे म्हणाले की, आम्हाला मलिक यांच्याबाबत वैयक्तिक आकस नाही. मात्र, त्यांच्यावरील आरोप गंभीर आहोत. देशद्रोह्यांसोबतच्या संबंधांसारखे गंभीर आरोप आहेत. त्यापायी त्यांना कारागृहातही रहावे लागले आहे. त्यामुळे फडणवीस यांनी घेतलेली भूमिका योग्यच आहे.
बावनकुळे म्हणाले की, नेत्यांवर आरोप होतच असतात. सरकारमध्ये गेल्यावर तर आरोप होतातच. पण नवाब मलिक यांचे प्रकरण वेगळे आहे. न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. अजित पवार हे प्रगल्भ नेते आहेत. त्यामुळे ते फडणवीस यांच्या पत्राची तसेच राज्या्चाय १४ कोटी जनतेच्या भावनांची दखल घेतील, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.