
(Nagpur)नागपूर : (NCP senior leader Praful Patel)राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी (Ajit Pawar)अजित पवार कधीतरी मुख्यमंत्री होतीलच, असा विश्वास व्यक्त केला आहे. अजित पवार हे महाराष्ट्राचे वजनदार आणि लोकप्रिय नेते आहे. त्यांना कधी ना कधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची संधी मिळेल, असे ते म्हणाले. नागपुरात बोलत होते. आज ती जागा रिकामी नाही मग चर्चा कशाला करता? असा प्रश्न उपस्थित करून पटेल म्हणाले की, आमचे पक्षाचे नेतृत्व आज नाही तर अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात करत आलेले आहे. काम करणाऱ्या माणसाला आज ना उद्या संधी मिळत असते आणि अनेक लोकांना मिळालेली आहे, असे ते म्हणाले.
अजित पवार हे मुख्यमंत्री होतील, असे दावे अनेकांकडून केले जात आहेत. अपात्र आमदारांच्या प्रकरणाचा निकाल लागल्यावर अजित पवार मुख्यमंत्री होण्याची शक्यता पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्याशिवाय अनेकांनी हे अंदाज बांधले आहेत.