
भाजपकडून पर्यायाची चाचपणी
(Mumbai)मुंबई : शिंदे गटातील १६ आमदार अपात्र ठरल्यास (Ajit Pawar)अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सध्या (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे विचाराधीन आहे. येत्या महिनाभरात त्यावर नार्वेकर यांना निर्णय घ्यावा लागणार आहे. सध्याची स्थिती पाहता हा निर्णय १६ आमदारांच्या विरोधात जाण्याची दाट शक्यता असून त्या स्थितीत अजित पवार यांचा पर्याय भाजपला निवडावा लागेल, असे संकेत मिळत आहेत. तर दुसरीकडे अशी चर्चा सुरु होण्यामागे शरद पवार गटातील आमदारांना आकृष्ट करण्याचे बंडखोरांचे राजकारण असल्याचे दावेही सुरु आहेत.
भाजप व शिंदे गटाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले असले तरी ही चर्चा अद्यापही सुरुच आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय झाल्यास भाजपला पर्यायांचा विचार करावा लागणार आहे. त्यासाठीच भाजपने अजित पवार यांना सरकारमध्ये सामावून घेतल्याची चर्चा आहे. मात्र, ही चर्चा सुरु करण्यामागे राष्ट्रवादीचा बंडखोर गट असल्याचेही बोलले जात आहे. अजित पवार गटाला किमान ३६ आमदारांची गरज आहे. मात्र, हा आकडा सध्या ३० ते ३२ पर्यंतच गेला असून पवार गटातील तसेच कुंपणावरील आमदारांना खेचण्यासाठी ही चर्चा सुरु करण्यात आल्याचा मतप्रवाह देखील आहे.