समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य नकोच – अजित पवार

0

 

पुणे -सुसंस्कृत महाराष्ट्राची घडी यशवंतराव चव्हाण यांनी बसवली. त्या पद्धतीने अनेक जणांनी महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम केलं. आज अनेक जण वेगवेगळे वक्तव्य करीत आहेत. त्यांना तो अधिकार घटनेनं दिला आहे. पण आता विकासाचे प्रश्न बाजूला राहत आहेत. समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करू नये.प्रत्येकाने आपआपली भूमिका मांडावी असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजितदादा  AJIT PAWAR  यांनी व्यक्त केले आहे.
आज जनता दरबार झाला,मधल्या काळात लोकांना भेटता आलं नाही.गेली अनेक वर्ष लोकं मला भेटण्यासाठी येत असतात. मिलेट व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट एक फूड इनक्यूबेशन सेंटर एक प्रकल्प बारामतीत करण्याचा निर्णय घेतला आहे, तिकडचा प्रकल्प बारामतीत आणला अशी अफवा पसरली. पण तिकडचा प्रकल्प इकडे आणला नाही.
40 दुष्काळी तालुक्यात बारामतीचा समावेश झाला आहे, समावेश केला नाही. ज्या तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला नाही. त्याठिकाणी समिती नेमली आहे. त्यामध्ये काही ठिकाणी दुष्काळ सदृश परिस्थिती म्हणून घोषित केली आहे. त्यांना देखील या सवलती मिळतील. जे तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झालेले आहेत, त्यांचा केंद्राकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. किती निधी मागवला आहे हे आत्ताच मी सांगणार नाही. ज्यावेळेस सरकारची मदत मिळेल त्यावेळेस मी सांगेन. पण ज्या ठिकाणी दुष्काळ सदृश परिस्थिती आहे, त्या ठिकाणी राज्य सरकारला खर्च करावा लागेल आणि त्याचा खर्च उचलायची राज्य सरकारची तयारी आहे.