मुंबईः विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देताना नाना पटोले यांनी कोणालाही विश्वासात घेतले नाही, ती मोठी चूक होती, असा दावा विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी केला होता. अजित पवारांच्या आरोपांवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी (MPCC President Nana Patole on Ajit Pawar allegations) पलटवार केलाय. “अजित पवार हे खोटारडे आहेत”, असा पलटवार पटोलेंनी केला आहे. पटोले म्हणाले की, “अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह आम्ही एकत्र अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांना भेटलो होतो. मला आदेश आला असल्याने राजीनामा द्यावा लागेल, असे त्यांना स्पष्टपणे सांगितले होते.”
पटोले म्हणाले की, “जर मी अध्यक्षपदावर नव्हतो, तर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना आमदारांवर अपात्रतेची कारवाई करता आली असती. ती त्यांनी केली नाही. एक वर्ष आम्ही अध्यक्षांची नेमणूक केली नाही, हे अजित पवारांनी मान्य केले. पण, उपाध्यक्षांनी अध्यक्षांचे अधिकार वापरले नाहीत,” असा टोलाही त्यांनी लगावला.
“अजित पवार खोटं बोलताहेत..”, पटोलेंचा पलटवार
MAHARASHTRA
MAHARASHTRA
LOCAL NEWS













