Ajit Pawar महाराष्ट्राच्या राजकारणात वर्षभरात पुन्हा भूकंप! राष्ट्रवादीत उभी फुट अजित पवार उपमुख्यमंत्री

0

राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार  याचा नेतृत्वात पक्षात  उभी फुट पडली असून या गटाने राष्ट्रीय लोकशाही आघाडी  वेगवान राजकीय घडामोडी नंतर अजित पवार याचा सह राष्ट्रवादीतून अनेक बड्या नेत्यांनी मंत्री पदाची शपत घेतली.After the great earthquake in the Nationalist Congress, how many legislators are the strength of Ajit Pawar’s students, the discussion has started in the political circles. Chhagan Bhujbal, Dilip Walse Patil, Hasan Mushrif, Dharmarao Atram, Dhananjay Munde, Aditi Tadkare, Sanjay Bansode, Anil Patil or MLA have taken oath as ministers in the government along with Deputy Chief Minister Ajit Pawar.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील महाभूकंपानंतर अजित पवार यांच्या पाठिशी किती आमदारांचे बळ आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धर्माराव अत्राम, धनजंय मुंडे, आदिती तडकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीचे बहुतांशी आमदार आमच्या सोबत असल्याचा दावा अजित पवारांनी केला आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हासह आम्ही सरकारला पाठिंबा दिला असून पक्षाच्या चिन्हावरच पुढील निवडणुका लढवणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले असल्याने अजित पवारांनी संपूर्ण तयारीनिशी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याचे राजकीय निरीक्षकांना वाटते.


उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर शरद पवारांना याची कल्पना आहे का असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी आम्हाला पक्षाच्या सर्वच नेत्यांचा आशीर्वाद असल्याचा दावा केला. मात्र, आमदारांचा आकडा जाहीर केलेला नाही. बहुतांशी आमदार आमच्यासोबत असल्याचे त्यांनी सांगितले. अजूनही मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार असून त्यातही इतरांना मंत्रिपदे मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हे चिन्ह आणि नावावरच आम्ही लोकसभा, विधानसभा निवडणुका लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.


मोदींचं नेतृत्व मजबूत-भुजबळ


दरम्यान, सरकारमध्ये मंत्री म्हणून सहभागी छगन भुजबळांनीही राष्ट्रवादीतील भूकंपावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो असल्याचे सांगितले. . राज्यातील प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला सकारात्मकतेने काम करणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज अतिशय मजबुतीने देशाचे नेतृत्व करीत असून जर मोदीच 2024 मध्ये पंतप्रधान होणार असतील तर आपण त्यांच्यासोबत गेले पाहिजे. आपण सरकारला मदत केली पाहिजे. उगाच रस्त्यावर भांडून प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे हा निर्णय घेतला, असे भुजबळ म्हणाले.
भ्रष्टाचाराच्या चौकशांमुळे गेल्याचा आरोप होत असला तरी त्यात अजिबात तथ्य नाही. शपथ घेतलेल्या लोकांपैकी अनेकांवर केसेस नाहीत. त्यामुळे उगीच कुणीतरी आमच्यावर आरोप करु नये. आम्ही आमचा निर्णय घेतला आहे. तुम्ही तुमचे काम करा, असा सल्लाही भुजबळांनी यावेळी विरोधकांना दिला.

विकास आणि मोदींच्या समर्थनार्थ घेतला निर्णय- अजित पवार

मुंबई, 02 जुलै  : महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना समर्थन देण्यासाठी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे अजित पवार यांनी सांगितले. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते आज, रविवारी बोलत होते.

यावेळी अजित पवार म्हणाले की, विकासाला महत्त्व दिले पाहिजे असे माझे आणि माझ्या सहकाऱ्यांचे मत आहे. गेल्या 9 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीने काम केले आणि विकास घडवला. ते पाहून आम्ही प्रभावित झालो. तसेच त्यांच्यासोबत काम कारावे असे आमचे मत बनले. देशाच्या राजकारणात आज सर्वच राजकीय पक्ष एकत्र येऊन नरेंद्र मोदींना विरोध केला आहे. त्यामुळे सरकारला बळकटी देण्यासाठी आम्ही मोदींसमवेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे अजित पवार यांनी सांगितले. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच या सत्तेत, सरकारमध्ये सहभागी झालो आहे. यापुढील निवडणुका आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावरच निवडणुका लढवणार आहोत, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

अजित पवार यांनी आज राज्यातील शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांचा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा आला आणि मी तो स्वीकारला असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. अजित पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार होते. तर 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामुळे शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे की अजित पवार यांच्या गटाचा अशी चर्चा रंगली आहे. अजित पवारांच्या शपथविधीला नुकतीच पक्षाची मोठी जबाबदारी मिळालेले आणि शरद पवार यांचे विश्वासू प्रफुल्ल पटलेही उपस्थित होते. त्यामुळे, आता शरद पवार काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

काय म्हणाले शरद पवार 

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. आता त्यांना मंत्रिपदाची शपथ देऊन त्यांनी घोटाळ्यातून मुक्त केले, याचा मला आनंद असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यावर पत्रकार परिषदेत बोलताना पवारांनी राजकीय घटनाक्रमावर भाष्य केले. माझा महाराष्ट्राच्या जनतेवर व विशेषतः तरुणांवर विश्वास असून मी जनतेत जाऊन संवाद साधणार आहे. उद्याच मी कऱ्हाडला स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन राज्याचा दौरा सुरु करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही. त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे पवारांनी यावेळी स्पष्टच सांगितले.
पवार म्हणाले की, आमच्या सहकाऱ्यांनी पक्षापेक्षा वेगळी भूमिका घेतली. जो प्रकार घडला, त्याची मला अजिबात चिंता नाही. आजचा प्रकार माझ्यासाठी नवा नाही. 1980 साली मला अनेक जण सोडून गेले होते. तेव्हा मी पक्ष पुन्हा बांधला. त्यामुळे हा प्रकार माझ्यासाठी नवीन नाही, असे शरद पवार म्हणाले.आजचा दिवस संपला, उद्या सकाळी मी बाहेर काढून यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन मी काम करणार आहे. ही माझी भूमिका आहे. माझा राज्यातील जनतेवर विश्वास आहे. मी लोकांमध्ये जाणार असल्याचे पवार म्हणाले. या घटनाक्रमानंतर मला विरोधी पक्षातील अनेकांचे फोन आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

-ईडीच्या कारवाईमुळे काही आमदार अस्वस्थ होते.
-मोदींच्या वक्तव्यानंतर त्यांची अस्वस्थता वाढली होती.
-उद्धव ठाकरेंशी फोनवर चर्चा झाली
-आम्ही न्यायालयात नाही, जनतेत जाणार.