पुणे PUNE – आज दिवाळी पाडवा सर्वत्र साजरा होत आहे. पवार कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे शरद पवार यांच्या निवासस्थान असलेल्या गोविंद बागेत येत असतात या ठिकाणी सकाळपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी झाली आहे. मात्र या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार AJIT PAWAR आणि आमदार रोहित पवार आज गैरहजर आहेत. महाराष्ट्राच्या नवीन पिढीसाठी रोहित पवार हे संघर्ष करतात त्याचा मला अभिमान आहे. अजित दादांना डेंग्यु झाल्याने ते या ठिकाणी उपस्थित नाहीत. जी गोष्ट आहे ती मोठ्या मनाने स्वीकारली पाहिजे. अर्धा ग्लास हा नेहमी अर्धाच असतो तो रिकामा नसतो देवाने मला आयुष्यात खूप गोष्टी शिकवल्या आणि यातून मी फार काही शिकले आहे, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
Related posts:
खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या 4 तारखेपासून मिळणार ‘ऑनलाईन पासेस’
November 2, 2025LOCAL NEWS
बजाज चौकातील उड्डाण पुलावरील लाईट तात्काळ सुरु करा : खासदार अमर काळे
November 1, 2025LOCAL NEWS
चंद्रपूर जिल्ह्यातून वगळलेल्या नऊ तालुक्यांना पुन्हा 'नक्षलग्रस्त' म्हणून समाविष्ट करा
November 1, 2025LOCAL NEWS
















