नागपूर (NAGPUR) : विरोधी पक्ष नेते अजित पवार (AJIT PAWAR) यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ते भाजपसोबत जाणार काय, अशी चर्चा रंगत असताना पुण्यानंतर आता नागपुरातही अजित पवारांच्या समर्थनात बॅनरबाजी सुरु झाली (Leader of Opposition Ajit Pawar) आहे. या बॅनरवर ‘वचनाचा पक्का, हुकमाचा एक्का मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादाचं पक्का’ असा मजकूर लिहिलेला असून राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी हे बॅनर लावल्याची माहिती आहे. नागपुरातील लक्ष्मीभवन चौक आणि इतर परिसरात हे बॅनर लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पुण्यातील कार्यक्रमात मुख्यमंत्री होण्याची इच्छा अजित पवारांनी व्यक्त केली होती. त्यानंतर पुण्यात जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून बॅनरही झळकले होते.
अजित पवारांची सासुरवाडी धाराशीव जिल्ह्यत आहे. तेथेही भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले आहेत. अशातच आता राज्याच्या उपराजधानीतही अजित पवार हेच ‘भावी मुख्यमंत्री’ असे बॅनर झळकले आहे. अर्थात हे बॅनर समर्थकांनी स्वतःहून लावल्याची चर्चा अधिक आहे. कारण त्या बॅनरवर कुठेही अजित पवारांचा फोटो नाही. त्यात शरद पवार, प्रफुल्ल पटेल व अनिल देशमुख या तिनच नेत्यांचे फोटो आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी स्वतःच्या प्रचारासाठीच बॅनर्स लावल्याची चर्चा नागपुरातील राजकीय वर्तुळात आहे.
AJIT PAWAR “मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादाच…” नागपुरातही झळकले पोस्टर्स
MAHARASHTRA
MAHARASHTRA
LOCAL NEWS













