Airtel, Jio, Vi नं केलेली दरवाढ, आता BSNL टॅरिफ प्लॅन्स वाढवणार का ?

0

BSNL News : काही दिवसांपूर्वीच खासगी टेलिकॉम कंपन्या एअरटेल, रिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया यांनी आपल्या टॅरिफ प्लॅनमध्ये बदल केले होते. परंतु बीएसएनएलनं कोणतेही बदल केलेले नव्हते. जर तुम्ही बीएसएनएल कंपनीचं सिम वापरत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बीएसएनएल ग्राहकांना महागाईचा फटका बसणार नाही. कंपनीनं सध्या टॅरिफ प्लॅनमध्ये वाढ करणार नसल्याचं स्पष्ट केलंय. एकीकडे खासगी कंपन्या आपले टॅरिफ प्लॅन महाग करत असताना बीएसएनएलचा हा निर्णय युजर्ससाठी दिलासादायक बातमी आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेडचे (BSNL) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रॉबर्ट रवी यांनी नजीकच्या काळात दरवाढ करण्याचा कोणताही विचार नसल्याचं स्पष्ट केलंय. “आज आमचं मुख्य ध्येय आपल्या युझर्सना खुश ठेवण्यावर आणि त्यांचा विश्वास जिंकण्यावर आहे. त्यामुळे नजीकच्या काळात दरवाढीची गरज वाटत नाही,” असं त्यांनी नमूद केलं. रिलायन्स जिओएअरटेल आणि व्होडाफोन आयडियासह भारतातील खासगी कंपन्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला दरवाढ केल्यानंतर बीएसएनएलचं हे पाऊल महत्त्वाचं मानलं जात आहे.