

टेक ऑफ करतांना विमान कोसळले
काठमांडू (Kathmandu) :- नेपाळमधील काठमांडू येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. बुधवारी त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सौर्य एअरलाइन्सचे विमान टेकऑफ दरम्यान कोसळले. या अपघातात किमान १८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार, पोखरा जाणाऱ्या विमानात एअरक्रूसह १९ जण होते. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. पोलीस आणि अग्निशमन दल अपघातस्थळी पोहोचले आहे. बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. या अपघातात विमानाचा चक्काचूर झाला असून प्रवाशांच्या जीविताची शक्यता कमी असल्याचे दिसून येत आहे.
टीआयएचे प्रवक्ते प्रेमनाथ ठाकूर यांनी सांगितले की, फ्लाइट क्रूसह 19 प्रवासी पोखरा-जाणाऱ्या विमानात होते. सकाळी अकराच्या सुमारास विमान कोसळले. अपघातस्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान बचावकार्य करत आहेत. अपघातानंतर संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.
काठमांडू पोस्टनुसार, राजधानीच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सौर्य एअरलाइन्सच्या (Solar Airlines) विमानाचा अपघात झाला. विमानतळावरील सूत्रांच्या हवाला देत काठमांडू पोस्टने लिहिले की, टेक-ऑफ दरम्यान विमान धावपट्टीवरून घसरले, त्यामुळे हा अपघात झाला. हे विमान काठमांडूहून पोखराला जात होते आणि त्यात एकूण 19 प्रवासी होते. अपघातानंतर विमानाला आग लागली आणि आकाशात धुराचे प्रचंड ढग पसरले. अपघातामुळे विमानाला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दल आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची टीम तैनात करण्यात आली आहे.
Nepal plane crash today
Plane crash in Nepal 2024
Kathmandu plane crash 2012
Plane crash in Nepal history
Nepal plane crash reason
Nepal plane crash pilot died
Nepal plane crash survivors
Nepal plane crash video