‘या’ तारखेपासून सुरु होणार अ‍ॅग्रोव्हिजन

0
अ‍ॅग्रोव्हिजन
agrovision-will-start-from-this-date

 

नागपूर (Nagpur) :- पीडीकेव्ही ग्राउंड, दामा, नागपूर येथे २२ नोव्हेंबर २०२४ पासून सुरू होणाऱ्या १५थ्या अॅग्रोव्हिजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शन कार्यशाळा व परिसंवादाचे भुमिपूजन मंगळवार दि. ५ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते करण्यात आले. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या या प्रदर्शनाचे स्टॉल व कार्यशाळेचे हॉल उभारणीच्या कामाला सकाळी स्थानीक पीडीकेव्ही, दाभा मैदानावर भुमीपूजन करून सुरवात करण्यात आली.

या प्रदर्शनासाठी सुमारे ११००० चौ. मि. चे हँगर, ६००० चौ. मि. आकाराचे खुल्या मैदानातील स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. कार्यशाळांसाठी ४ हॉल्स, असा एरिया या प्रदर्शनाने व्यापला असेल.

गेल्या अ‍ॅग्रोव्हिजन च्या सर्व सत्रांना शेतकरी बांधव व शेतीसंबंधी सर्वांकडून भरगच्च प्रतिसाद मिळाला. यावर्षीही १५ च्या अ‍ॅग्रोव्हिजन ला असाच प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा असुन यावेळी आजपर्यंत ३०० पेक्षा अधिक कंपन्यांनी यात आपला सहभाग निश्चित केल्याचे श्री. रवि बोरटकर यांनी सांगीतले. भारतातील शेतीविषयक उत्पादने तयार करणाऱ्या अनेक मोठ्या कंपन्या, संशोधन संस्था, शासकीय विभाग, विविध राज्ये व कृषी विद्यापीठे प्रदर्शनात आपले तंत्रज्ञान सादर करणार आहेत. सोबतच देशात कृषी क्षेत्रात आघाडीवर असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञान, संशोधन व सेवा विषयक संस्था, या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. युपीएल, अॅग्रोव्हिजनचा इव्हेन्ट स्पॉन्सर असून, टॅफे, कुबोटा, महिंद्र ट्रॅक्टर्स, सोनालिका जॉन डिअर यासारख्या ट्रॅक्टर कंपन्या, अंकूर सिड्स, अजित सिड्स, महाबीज, रासी सिड्स, माहिको सिड्स, या सारख्या बियाणे उत्पादन कंपन्या, बीकेटी टायर्स, आयटीसी, धानुका, जिक्रस्टल क्रॉप केअर, सल्फर मिल्स, पारीजात इंडस्ट्रिज, टाटा अॅग्रीकोज, प्लॉस्टो, जैन इरिगेशन, धंनस तसेच सोलर क्षेत्रातील कंपन्या, आयसीएआर लॅब्ज, एनएफडीबी, आरसीएफ, इफको या संस्थांनी तसेच सीडबी, एसबीआय या सारख्या बँका अशा अनेक मोठ्या कंपन्या तसेच आयआयटी खरगपूर, व्हिएनआयटी नागपूर, पीडीकेव्ही अकोला, माफसु या सारख्या शैक्षणिक संस्थांनी आपला सहभाग निश्चित केला आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही अ‍ॅग्रोव्हिजन मध्ये एमएसएमई अंतर्गत पंजीकृत् उद्योगांसाठी विशेष दालन असणार आहे. या उद्योगांना खास सवलतीच्या दरात स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात येण्ट्र आहेत. १२ नोव्हेंबरच्या आत एमएसएमई उद्योगांनी स्टॉल बुकिंगसाठी आवेदन करून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

१५व्या अॅग्रोव्हिजन मध्ये शेतकऱ्यांसाठी ३० विषयांवर कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत यात उस, शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीओ), कृषी क्षेत्रात तरुणाचा सहभाग विदर्भातील दुग्धव्यवसायाची व्याप्ती, ऊस उत्पादन, शेतकरी उत्पादक संस्था, मत्स्यव्यवसाय या विषयांवर दिर्घकालीन कार्यशाळा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन म्हणून ओळखले जाणारे हे १५ वे अॅग्रोव्हिजन २२ ते २५ नोव्हेंबर २०२४ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी अ‍ॅग्रोव्हिजन सचिवालय, गोविंद अपार्टमेन्ट, शंकर नगर, नागपूर फोन – २५५५२४९, २५४४९२९ येथे संपर्क साधावा.

याप्रसंगी अ‍ॅग्रोव्हिजन सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी, संयोजक, डॉ. गिरीष गांधी, आयोजन सचिव, श्री. रवि बोरटकर, डॉ. डी.के. घोष, संचालक सीसीआरआय, डॉ. एन.जी.पाटील, संचालक, एनबीएसएस अॅन्ड एलयूपी, डॉ. जी.टी. बेहेरे, सीआयसीआर, डॉ. के, पांडीयन, जी.टी.सी., सिरकॉट, अ‍ॅग्रोव्हिजन सदस्य, श्री. शिरीष भगत, श्री. मिलींद टिचकुले, श्री. प्रशांत कुकडे, कॅप्टन एल, बी, वालंत्री, श्री. प्रविण भालेराव, डॉ. हितेंद्र सिंग, श्री. प्रशांत वासाडे, डॉ. सुनिल सहातपुरे, डॉ. के. डी. ठाकूर, कृषी महाविद्यालयाचे डॉ. विलास अतकरे, डॉ. प्रकाश कडू, डॉ. विजय इलोरकर, डॉ.व्ही.एस. खवले, डॉ. राहुल वडसकर, माफतु थे डॉ. नितीन कुरकुरे, श्री. आनंदबाबू कदम, आदि मान्यवर उपस्थित होते.