Home NAGPUR NEWS Agrovision Foundation : करणार आचार्य देवव्रत लिखित “प्राकृतिक खेती”

Agrovision Foundation : करणार आचार्य देवव्रत लिखित “प्राकृतिक खेती”

0
Agrovision Foundation : करणार आचार्य देवव्रत लिखित "प्राकृतिक खेती"
agrovision-foundation-natural-farming-by-acharya-devvrat

नागपूर (Nagpur) :- महाराष्ट्र अॅग्रोव्हिजन फाऊंडेशन प्रसिद्ध कृषी तज्ज व गुजरातचे गव्हर्नर आचार्य देववत यानी लिहिलेल्या नैसर्गिक शेतीवरील हिंदी पुस्तक ‘प्राकृतिक खेती” च्या मराठी आवृतीचे प्रकाशन करणार आहे, आचार्य देवव्रत यांनी मुळ हिंदीत लिहिलेले हे पुस्तक अॅग्रोव्हिजनच्या 2023 च्या उदघाट्न कार्यक्रमात त्यानी ऍग्रोव्हिजन चे मुख्य प्रवर्तक मा. ना. श्री. नितीन गडकरी यांना सादर केले व ते पुस्तक वैदर्भीय शेतकऱ्यापर्यंत पोहचावे म्हणून माननीय नितीनजीनी स्वतः पुढाकार घेऊन त्याचा मराठी अनुवाद करवून घेतला. या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘नैसर्गिक शेती” चा प्रकाशन सोहळा रविवार, २५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता डॉ वसंतराव देशपांडे स्मृती सभागृह, नागपूर येथे होणार आहे

श्री आचार्य देवव्रत, नैसर्गिक शेती पद्धतीचा प्रचार करण्याच्या त्यांच्या व्यापक कार्यासाठी ओळखले जातात त्यानी है पुस्तक पर्यावरणास अनुकूल आणि आर्थिकदृष्ट्‌या व्यवहार्य अशा नैसर्गिक शेतीचे जान आणि तंत्र शेतकऱ्यांना समजावे यासाठी लिहिले आहे. ते गुजरातचे राज्यपाल असून यापूर्वी त्यांनी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिले आहे. पारंपारिक शेती पद्धतीचे पुरस्कर्ते, आचार्य देवव्रत यांनी निसर्गाशी सुसंगत शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्याच्या कार्याचा हजारो शेतकऱ्याऱ्यांना फायदा झाला आहे. ते लेखक आणि उत्कृष्ट वक्ते देखील आहेत, त्यानी विविध प्लॅटफॉर्मवर नैसर्गिक शेतीब‌द्दलचे त्याचे प्रयोग शेअर केले आहेत.

अॅग्रोव्हिजन फाऊंडेशन ही एक एनजीओ असून अनेक वर्षापासून शिक्षण, प्रशिक्षणा‌द्वारे शेतकऱ्यांना सक्षम करण्याचे काम करीत आहे. दरवर्षी मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी संमेलन अॅग्रोव्हिजन चे आयोजन अॅग्रोव्हिजन फॉउंडेशन द्वारे केले जाते. नैसर्गिक शेती या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन, हा फाऊंडेशनच्या समृद्ध शेती पद्धतीना चालना देण्यासाठी आणि शेतकरी आणि संबंधित कृषी व्यवसायाच्या विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे. “नैसर्गिक शेती” (Natural farming) हे पुस्तक नैसर्गिक शेतीसाठी एक सर्वसमावेशक मार्गदर्शिका आहे, निसर्गाशी सुसंगत असलेल्या शाश्वत शेती पदधतीची माहिती हे पुस्तक देले.

२५ ऑगस्ट रोजी अॅग्रोव्हिजन फाउंडेशनतर्फे वधर्धा रोडवरील त्यांच्या शेतकरी प्रशिक्षण केंद्राचा भूमिपूजन सोहळाही राज्यपालांच्या हस्ते पार पडणार आहे. वर्षभर शेतकऱ्याऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळण्याची सोय व्हावी याकरिता ऍग्रोव्हिजन फॉउंडेशन ‌द्वारे हे प्रशिक्षण केंद्र उभारले जात आहे या केंद्रात 500 लोकांच्या क्षमतेचे सभागृह, 100 लोकांच्या क्षमतेचा कॉन्फरन्स हॉल, व प्रशिक्षण हॉल तसेच एकूण 45000 चौरस फूट परिसरात मजली इमारतीत कापूस चाचणी आणि माती परीक्षण प्रयोगशाळा, थेट शेतकरी ते ग्राहक विक्रीसाठी छोटी बाजारपेठ आणि इतर सुविधा असतील, प्रशिक्षण, कार्यशाळा आणि प्रात्यक्षिकां ‌द्वारे शेतकरी समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी ऍग्रोव्हिजन फॉउंडेशनचे शेतकरी प्रशिक्षण केंद्र हे एकमेव ठिकाण असेल.

२५ ऑगस्ट रोजी देशपांडे सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाला कैद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, अॅग्रोव्हिजन चे मुख्य प्रवर्तक श्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहे. गुजरातचे राज्यपाल आणि “नैसर्गिक शेती” चे लेखक श्री आचार्य देवव्रत, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी वि‌द्यापीठ अकोला चे कुलगुरु डॉ. शरद गडाख, आणि महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान वि‌द्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, ही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. श्री आचार्य देववत हे शेतक-यांना नैसर्गिक शेती पद्धतीबाबत मार्गदर्शनही करणार आहेत. प्रमुख पाहुण्यांची दूरदृष्टी आणि अनुभव आजच्या कृषी क्षेत्रात नैसर्गिक शेतीचे महत्व यावरील चर्चेला अधिक अर्थपूर्ण करतील.

पत्रकार परिषदेला अॅग्रोव्हिजन फाउंडेशनचे अध्यक्ष रवी बोरटकर, अॅग्रोव्हिजन फाउंडेशनचे सचिव डॉ. सी.डी. माई आणि अॅग्रोव्हिजन फाऊंडेशनचे कार्यकारी सदस्य श्री. सुधीर दिवे यांनी संबोधित केले. पत्रकार परिषदेला अॅग्रोव्हिजन फाउंडेशनचे श्री रमेश मानकर, श्री शिरीष अगत, श्री प्रशांत कुकडे, श्री. आनंदराव राऊत, श्री. मिलिंद टिचकुले व इतर सदस्यही उपस्थित होते. शेतकरी समुदायातील सर्व सदस्यांना, पर्यावरणप्रेमींना आणि सर्वसामान्यांना या ज्ञानवर्धक कार्यक्रमात सामील व्हावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले.