विविध मागण्यांसाठी अंगणवाडी, बालवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

0

 

नागपूर – महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी संघटना आपल्या विविध मागण्यांसाठी राज्य सरकारविरोधात आंदोलन करत आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, वेतनश्रेणी, महागाई, अन्य भत्ते, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी, मासिक पेन्शन यासंबंधी मागण्यांची पूर्तता व्हावी, यासाठी हा आंदोलन पुकारण्यात आले आहे. या संपाचा आज 24 वा दिवस आहे. तरीही या मागण्यांची अद्याप पूर्तता झालेली नाही. सरकार केवळ आश्वासन देते, कृतिआराखडा देत नाही. केवळ आश्वासनांनी पोट कसे भरणार? असे विचारत आशा सेविकांप्रमाणे आम्हाला मानधनवाढ कधी मिळणार? असा प्रश्न अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीसांनी उपस्थित केला आहे. सोबतच आयटेकच्या कर्मचाऱ्यांनी आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर आंदोलन तीव्र होईल असा इशारा दीप्ती सहारे, नागपूर सेक्रेटरी आयटक यांनी दिला आहे.