
नागपूर NAGPUR – नव्या हिट अँड रन कायद्याविरोधात वाहन चालक आक्रमक असून आज हजारो चालक संविधान चौक परिसरात एकवटले. ड्रायव्हर युनियन,ड्रायव्हर एकता जिंदाबाद अशा घोषणा देत या कायद्याविरोधात आक्रमक वाहन चालक मोर्चाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यास पोहचले. पोलिसांनी मोर्चा अडविल्यानंतर शिष्टमंडळामार्फत निवेदन देण्यात आले. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर 4 जानेवारीपासून यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.
आम्हाला तातडीने न्याय मिळावा आणि सर्व सुरळीत व्हावं हीच आमची मागणी आहे असे माध्यमांशी बोलताना अमित शहाणे यांनी स्पष्ट केले.