

– धर्मरावबाबा आत्राम
गोंदिया (Gondia)- एकनाथ खडसे (Eknath Khadse)ज्येष्ठ नेते असून ते जर भाजपात येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे.लोकसभेनंतर अनेक लोक हे राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना गटामध्ये प्रवेश करतील असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Nationalist Congress Party Leader, Food and Drug Administration Minister Dharma Rao Baba Atram)यांनी केला आहे.
विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar)यांच्या दाव्याबाबत बोलताना अनेक चॅनेलमध्ये दोन जागा, तीन जागा, चार जागा अशा दाखवल्या आहेत. राष्ट्रवादी ही सात जागांवर आणि एक ठिकाणी सहयोगी पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहे. गडचिरोली, चिमूर क्षेत्रामध्ये उमेदवार मिळालेला नाही.
काँग्रेसने उमेदवार आयात करून उभा केला आहे. त्याला निवडून आणण्यासाठी त्यांची फडफड होत आहे.