
ऍड. प्रकाश आंबेडकर यांची माहिती
अमरावती AMRAWATI : अमरावतीच्या खासदार NAVNEET RANA नवनीत राणा सध्या मुंबईच्या मुलुंड कोर्टात घिरट्या घालत आहेत. येत्या ६ महिन्यात त्या कारागृहात दिसतील अशी माहिती वंचीत बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍडव्होकेट Prakash Ambedkar प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी (ता.६) अमरावतीत दिली. यावेळी त्यांनी आमदार रवी राणा यांच्यावरही भाष्य केले. रवी राणा यांचा सतत घुमजाव सुरु आहे. एकीकडे ते BJP भाजपतर्फे लढणार असे जाहीरपणे सांगतात तर दुसरीकडे मात्र आम्हाला राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळेल असे हळू आवाजात बोलतात. अद्याप त्यांची भूमिका निच्छितच झाली नसल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
शिवसेनेसोबत आमचं २४-२४ च ठरलंय
विधानसभा निवडणुकीत वंचीत बहुजन आघाडी व शिवसेना एकत्र लढणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना-वंचीतला २४-२४ जागा हे समीकरण ठरले आहे. मोदी व बीजेपीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावे हि आमची भूमिका आहे. यासाठीच वंचीतला महाविकास आघाडीत किंवा इंडिया आघाडीत शामिल करून घ्यावे हा प्रस्ताव वंचिततर्फे देण्यात आला आहे. त्या प्रस्तावावर अद्याप निर्णय झालेला नाही. काँग्रेसची भूमिका दुटप्पी आहे, राष्ट्र्वादीनेही अजून काही सांगितलं नाही. असे असले तरी आता वंचित आघाडीला महाविकास आघाडीत सामावून घेण्याची बोलणी शिवसेनेला पूर्ण करायची आहे. आम्ही मात्र महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीसोबत जाण्यास इच्छूक असल्याचा खुलासा प्रकाश आंबेडकर यांनी केला.
राम मंदिर कार्यक्रमाला जायचे कि नाही हे पार्टी ठरवेल
येत्या २२ जानेवारीला होणाऱ्या अयोध्या राम मंदिर लोकार्पण कार्यक्रमाचे अधिकृत निमंत्रण मला माझ्या अकोला किंवा मुंबई येथील घरी मिळालेले नाही. त्यामुळे मला निमंत्रण आले असल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत. येत्या दिवसात जर ते निमंत्रण मिळालेच तर मी त्या कार्यक्रमाला जायचे कि नाही हा निर्णय आमची पार्टी घेईल असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
पदामागे पळणारा मी नव्हे !
रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांचेसाठी मंत्री पद सोडण्याची घोषणा केली, यावर बोलतांना प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले कि मला जर मंत्री व्हायचे असते तर कधीचाच झालो असतो. मुख्यमंत्रीही माझ्या मागे पळतात, पदामागे पळणारा मी नव्हे ! मात्र मोदीला व भाजपला रोखण्यासाठी आम्ही समविचारी सगळ्यांनासोबत मैदानात उतरण्यास सज्ज असल्याचा दावाही त्यांनी यावेळी बोलताना केला.