अॅड. अविनाश तेलंग यांची शासनाच्‍या ज्येष्ठ नागरिक कार्यकारी समितीवर नियुक्ती

0

अॅड. अविनाश तेलंग यांची शासनाच्‍या
ज्येष्ठ नागरिक कार्यकारी समितीवर नियुक्ती
नागपूर (Nagpur), 8 ऑगस्‍ट
महाराष्‍ट्र राज्‍याचे सर्वसमावेशक ज्‍येष्‍ठ नागरिक धोरण – 2013 ची परिणामकारक व योग्‍य अंमलबजावणी करण्‍यासाठी राज्‍याचे मुख्‍य सचिवांच्‍या अध्‍यक्षतेखाली ज्‍येष्‍ठ ना‍गरिक कार्यकारी सम‍ितीचे (स्‍टेट एक्झिक्‍युटीव्‍ह कौन्सिल) पुनर्गठन करण्‍यात आले आहे. यात महाराष्‍ट्रातील सहा प्रादेशिक विभागाचे प्रतिनिधी निवडण्‍यात आले असून नागपूर विभागाचे प्रतिनिधी म्‍हणून अॅड. अविनाश तेलंग यांची निवड करण्‍यात आली आहे.

अॅड. अविनाश तेलंग हे ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भचे सचिव असून नीरीच्‍या एथिक्‍स कम‍िटीचेदेखील सदस्‍य आहेत. ज्‍येष्‍ठांना सन्‍माननीय जीवन जगता यावे, त्‍यांना राष्‍ट्रीय संपत्‍तीचा दर्जा मिळावा व राज्‍य व केंद्र सरकारने त्‍यांना योग्‍य मानधन द्यावे यासाठी मागील अनेक वर्षापासून झटत आहेत.

नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्‍ह्यातील नागरिकांच्‍या समस्‍या, त्‍या सोडवण्‍यासाठी नवीन कल्याणकारी योजनांबाबत धोरण आखणे, त्या धोरणांची तसेच 2013च्या सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरणांची परिणामकारक व योग्य रीतीने अंमलबजावणी करण्‍याच्‍या अनुषंगाने ही निवड करण्‍यात आली आहे.
अॅड. तेलंग यांनी सर्वच ज्येष्ठ्यांच्या आरोग्याच्या, सन्मानाच्या, कायदेशीर, कौटुंबिक व सामाजिक समस्या सोडविण्याचे पूर्वीचेच कार्य व्यापक प्रमाणावर करण्याची विशेष संधी दिल्याबद्दल महाराष्‍ट्र शासनाचे आभार मानले आहेत.

(संपर्क : अॅड. अविनाश तेलंग – 94200 74125)