आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल शिंदे गटात जाणार

0

(Mumbai)मुंबई : (Uddhav Thackeray)उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्के बसणे सुरुच आहे. युवा सेनेचे नेते व (Aditya Thackeray)आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी जाहीरपणे जय महाराष्ट्र केला असून ते उद्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती (Youth Leader Rahul Kanal to join Shinde Camp) आहे. ठाकरे गटाने वांद्रे पश्चिम मतदारसंघातील सर्व युवासेना युवक पदाधिकाऱ्यांच्या पदांना स्थगिती दिल्यावर कनाल यांनी ठाकरे गटाच्या विरोधात आपले पहिले ट्विट केले. “मी प्रमाणिक काम करणाऱ्या, दिवस-रात्र काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची माफी मागतो. माझ्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल. पण ही फक्त सुरूवात आहे” असे राहुल कनाल यांनी नमूद केलेय.
कनाल यांनी नमूद केले की, ज्यांनी तुमच्यासाठी काम केले, अशा लोकांचे ऐकून न घेता त्यांना काढून टाकणे म्हणजे अहंकार आहे. तुम्ही मला हटवू शकलात पण त्या लोकांना नाही ज्यांनी रात्रंदिवस काम केले. तरीही चलो अच्छा है सबको पता चले के अहंकार क्या होता है, असेही कनाल म्हणाले.