आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

0

मुंबई : दिशा सॅलियन एसआयटीप्रकरणी आमदार आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला. ज्यांची त्यांना भीती वाटते त्यांना बदनाम करायचे काम सुरू असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली. याशिवाय सरकार यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा आरोपही आदित्य ठाकरेंनी केला. त्याचप्रमाणे सरकार ३१ डिसेंबरला पडणार असल्याची भविष्यवाणीही आदित्य ठाकरेंनी केली.
युवासेनेकडून ‘स्वेट ऑन स्ट्रीट’ या कार्यक्रमाचे आयोजन गोरेगाव येथे करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. आदित्य ठाकरे म्हणाले, सरकारकडून यंत्रणेचा गैरवापर होत आहे. घटनाबा सरकार आहे. घटनाबा मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या एफडी नक्कीच वाढवल्या असतील. पण घाबरू नका ३१ डिसेंबरला हे सरकार पडणार म्हणजे पडणारच आहे. पालिकेला दक्षिण मुंबईच्या रोड संदर्भात प्रश्न विचारलेले आहेत मात्र अजूनही उत्तर दिले नाही.