
केंद्रीय लोकसेवा आयोगद्वारे झालेल्या परीक्षेत लेफ्टनंटपदी झाली निवड
हिंगणघाट :- केंद्रीय लोकसेवा आयोग व्दारे झालेल्या परीक्षेत देशात ४८ वा क्रमांक मिळवून आदित्य हनुमानजी गुडदे यांची लेफ्टनंट पदी निवड झाल्याबद्दल आधार फाउंडेशनच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला.
केंद्रीय लोकसेवा आयोग द्वारे इंडियन आर्मीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला. या परीक्षेत स्थानिक आदर्श नगर येथील आदित्य गुडदे या विद्यार्थ्यांने SSC टेच (आर्मी) मध्ये देशात ४८ वा क्रमांक मिळवून त्यांची लेफ्टनंट पदी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी आणि इतर विद्यार्थ्यांना त्याच्यापासून प्रेरणा मिळावी यासाठी आधार फाऊंडेशनच्या सदस्यांनी त्याच्या निवासस्थानी जाऊन रोपटे, शाल व सन्मानचिन्ह आणि मिठाई देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आधार फाऊंडेशनच्या कार्यकारी अध्यक्षा सौ.माधुरी विहिरकर यांनी त्याचे अभिनंदन करुन त्याला त्याच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी आदित्य गुडघे यांनी आपल्या यशाचा प्रवासाचे कथन केले. यावेळी आदित्य गुडदे यांचे वडील श्री हनुमान गुडदे, आई सौ.पुष्पा गुडदे यांच्यासह त्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आधार फाऊंडेशनचे कार्यकारी अध्यक्षा सौ.माधुरी विहिरकर, निलेश गुल्हाने,प्रा.डाँ. शरद विहिरकर, मधुकर चाफले, सौ.माया चाफले,सौ.ज्योती धार्मिक, प्रा.डॉ.अनिल बाभळे, सौ.अनिता गुंडे, सौ.वैशाली लांजेवार, डॉ.गिरीधर काचोळे, चंद्रशेखर निमट, सुहास घिनमीने, जगदीश वांदिले, सुरेश गुंडे आदी उपस्थित होते.