उपरवाही येथील काँग्रेस, शेतकरी संघटना व विजयक्रांती संघटनेचे कार्यकर्ते भाजपात!

0

विकास व लोककल्याणासाठी जनतेची भाजपलाच पसंती; आमदार देवराव भोंगळे यांचे प्रतिपादन.

गडचांदूर, दि. १९:-सर्वांगीण विकास व लोककल्याणासाठी आता जनतेने भाजपलाच पसंती जाहीर केली आहे. आगामी काळात मोठ्या प्रमाणावर भाजपात इनकमिंग होणार असून त्याची सुरवात आता झाली आहे. असे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले.
सोमवारी (दि.१८) गडचांदुर येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या उपरवाही येथील विविध पक्षातील कार्यकर्त्यांच्या जाहीर पक्षप्रवेशावेळी ते बोलत होते.

स्थानिक मा. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र तथा भाजपा जनसंपर्क कार्यालयात काँग्रेस, शेतकरी संघटना व विजयक्रांती कामगार संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन भाजपची वाट धरली.

देशाच्या व राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आता भाजप हाच एकमेव पर्याय आणि पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांचे सर्वमान्य नेतृत्व जनतेला पटले असून जनता आशेने त्याचा स्विकार करत आहे. विकासाचा स्पष्ट दृष्टीकोन भाजप-महायुती सरकारच्या कामगिरीतून दिसून येते. स्थानिक आमदार देवराव भोंगळे हे आमदार झाल्यापासून या भागातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते अहोरात्र झटत आहेत. त्यामुळे आम्ही भाजपचा पर्याय निवडला; अशी भावना नवप्रवेशित कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली.

याप्रसंगी आपल्या मनोगतात आमदार देवराव भोंगळे म्हणाले की, भाजपा-महायुती सरकार हे जनतेचे सरकार आहे. तळागाळातील शेवटच्या समाजघटकाच्या चेहऱ्यावर समाधानाचा भाव दिसावा यासाठी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी आग्रही असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप-महायुतीचे सरकार आज लोककल्याणासाठी तत्पर आहे. त्यामुळेच सामान्य नागरीकांसोबतच विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनाही आता विकास म्हणजे भाजपा असा आशावाद दिसून येत आहे.
पुढे बोलताना, आज विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी आमच्या परीवारात सामील होण्याचा निर्णय घेतला; मी त्यांचे मनःपूर्वक स्वागत करतो आणि त्यांच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील जनतेची सेवा घडावी, अशी अपेक्षा व्यक्त करतो असेही ते म्हणाले.

या नवप्रवेशितांमध्ये आकाश सोमलकर, मंगेश एलादी, सचिन चिकराम, रवी कोटांगले, अतुल मडावी, प्रमोद काकडे, महेश मुसळे, अमित पानघाटे, किसन बावणे, संदीप देवाळकर, प्रशांत नवलकर, विनोद मडावी, अनील येवले, पुरुषोत्तम भुजाडे, प्रेम ढुमणे, बापू काकडे, प्रवीण वडकी, आशिष जवादे, अनील बावणे, विकास सोमलकर, सचिन वडकी, कडीलाल सेन, मुरलीधर बोंडे, भाऊराव मते, वैभव जुनघरी, किसन चीकराम, संदीप देवाळकर, किसन बावणे, भूषण घुंगरू, अभय जवादे, पांडुरंग विंचु, दिलीप घुंगरूड, गजानन मते, प्रशांत नवलकर, विनोद मडावी, प्रवीण वडकी, सचिन वडकी, अजय गोलापल्ली, अमित पानघाटे, विकास सोमलकर,भूषण मोरे, अतुल मडावी, सचिन चिकराम, अनिल बावणे, बबलू कुमरे , प्रेमसागर ठमके (हरदोना), पुरुषोत्तम गुणाळे, प्रवीण वडकी, योगेश कोटनाके, गजानन बावने, रवी कोटागले, सचिन घाटे, बापूजी काकडे, गणेश देवतळे, धनराज पिंपळशेंडे, मिथून क्षीरसागर, संदीप कोडे, महेश मुसळे, गजानन बावणे, अनिल येवले,रंजीत डोंगे, मुकेश पोटे, अभय जवादे, सागर गेडाम, शंकर केळकर, सुनील सोमलकर व यांचा समावेश आहे.

या कार्यक्रमाला कोरपना भाजपचे तालुकाध्यक्ष संजय मुसळे, तालुका महामंत्री सतिश उपलेंचवार, राजुराचे तालुकाध्यक्ष वामन तुराणकर, शहराध्यक्ष अरविंद डोहे, महामंत्री हरीश घोरे, रामकृष्ण मुसळे, महेश घरोटे, विशाल अहिरकर, सचिन आस्वले, विक्की उरकुडे, वैभव पोटे, रमेश चौधरी, विजयालक्ष्मी डोहे, शितल धोटे, अपर्णा उपलेंचवार, उमा कंठाळे, नैना चौधरी, पूजा वाघमारे यांचेसह अनेकांची उपस्थिती होती.