
नागपूर – नागपुरात शनिवारी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत अजित पवार गटाचे कार्यकर्ते आज सत्तेत असताना सरकारविरोधात आक्रमक झाले. नुकसानग्रस्त लोकांना घेऊन नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी धडक मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारावर बसून प्रशासनाच्या विरोधात नारेबाजी केली. कार्यकर्त्यांचे म्हणणं आहे की, अतिवृष्टीमुळे लोकांच्या घरातील वस्तू आणि धान्य वाहून गेलं, आज अतिवृष्टी होऊन 5 दिवस झाले, तरी देखील अद्यापही प्रशासनाकडून कोणीही कर्मचारी चौकशी करायला आलेले नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोजक्याच घरांची पाहणी केली आणि पंचनामे सुद्धा त्यांचेच होत आहे. एकंदरीत गरिबांकडे नेते व प्रशासन दोघांनी दुर्लक्ष केलं. जोपर्यंत पंचनामे होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असे शहराध्यक्ष, अजित पवार गट ल प्रशांत पवार यांनी म्हटले आहे.