पिस्तुलासह आरोपीला अटक

0

गोंदिया(Gondia), ११ मे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोंदिया शहरातील श्रीनगर परिसरातून एका इसमाकडून एक विदेशी बनावटीची पिस्तूल आणि ५ जिवंत काडतूस जप्त केली आहे.

गोंदिया शहरातील गुन्हेगारी कमी व्हावी या उद्देशाने गोंदिया पोलिसांकडून कारवाईचा सपाटा सुरू करण्यात आला आहे… दरम्यान विक्रांत उर्फ मोनू बोरकर हा संशयास्पद रीतीने पोलिसांना आढळून आला दरम्यान त्याच्याकडून विदेशी बनावटीची पिस्तूल व ५ जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी आरोपी विक्रांत बोरकर याच्या विरोधात गोंदिया शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.