

आ. समीर मेघे (Sameer Meghe) यांच्या जनसंवाद यात्रेला चौफेर प्रतिसाद
हिंगणा विधानसभा क्षेत्रात सध्या भाजप महायुतीचे उमेदवार आमदार समीर मेघे यांच्या नावाचीच चर्चा असून मेघे यांनी सुरू केलेल्या जनसंवाद यात्रेला नागरिकांचा चौफेर प्रतिसाद लाभतो आहे. मेघे यांनी आपल्या दौऱ्याला केवळ प्रचारकी रूप न देता प्रत्यक्ष लोकांना भेटत, त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधत नागरी सुविधा आणि समस्यांबाबत चर्चा करताना दिसून आले. शिवाय, दहा वर्षात केलेल्या विकासकामांची आठवण करून देतानाच आगामी योजनांची मांडणीही समीर मेघे करीत असल्याचे चित्र आज पहायला मिळाले.
आ. समीर मेघे यांनी आज नीलडोह, इसासनी, अमरनगर, भीमनगर, शिवनगर, शांतीनगर आदी भागाला भेट देत तेथील नागरिकांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या. तत्पूर्वी त्यांनी या दोन दिवसात कान्होलीबारा, खडकी, रायपूर, घोडेघाट, आजनगाव, गोंडवाना, खापरी (गांधी), खापरी (मोरे), बीड गणेशपूर, सुकळी, नेरी (मानकर), मंगरूळ, मेटा उमरी, मोहगाव (झिल्पी), मांडव घोराड, किन्ही (धानोली), खैरी (पन्नासे), जुनेवानी, मोंढा, बीड बोरगाव, देवळी, सावंगी, आमगाव, खडका, सुकळी अशा अनेक गावातील लोकांशी थेट संवाद साधत या क्षेत्रात नव्याने काय करता याबाबत विचारणाही केली. अद्यापही काही गावांमध्ये मूलभूत सुविधा प्राप्त झाल्या नसतील तर निवडणुकीनंतर या गरजांची पूर्तता करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असा शब्द समीर मेघे यांनी ग्रामवासीयांना दिला.
या जनसंवाद यात्रेत आ. मेघे यांच्यासोबत आशिष चौधरी, अविनाश सोमनकर, गोविंद कुनखडकर, संजय उरकुडे, अर्चना गिरी, राजू हरडे, अंबादास उके, नरेन्द्र वाघ, विकास दाभेकर, विशाल भोसले, प्रदीप सोमनकर, शुभम उडान, वंदना पिंपळे, प्रशांत आदमने, गजेंद्र खहोब, उमेश कुकडकर, पल्लवी कुकडकर, रवींद्र काटवे, तुषार लोखंडे, सोहनसिंग करनाके, रवींद्र करनाके, विजय सावरकर, नंदू सावरकर, शंकर इंगोले, नरेंद्र येसंसुरे, दिनेश राऊत, चंद्रभान मरकाम, विष्णू ठवकर, जगदीश मंडल, योगेश रहांगडाले, सोनू साहू, पंकज चौधरी, मयूर पटले, कुणाल मते, रामकृष्ण पटले, गौरव रहांगडाले, कुंदन सिंग, आकाश रहांगडाले, ललित पटले, विशाल यादव, प्रजित सोनटक्के, अमान दाग, प्रज्वल कानतोडे, राहुल रहांगडाले, राहुल रोहिनवार, कैलाश गिरी, लीलाधर पटले, राजू घाटोळे, मंगेश हरणे, अरविंद ढोणे, वनिता गळमळे, प्रशांत पटले, प्रवीश बाबडा, सुजित भोयर, दिवाण पारधी, बंडू कष्टी, सुभाष खडेकर, राकेश दुबे, पंचशीला मंडपे, सुनीता बिजेवार, रेखा कुडे, कल्पना सहारे, इंदुबाई चौधरी, गीता हरणखेडे, सुरेश ठाकरे, सिध्दांत वाणी, लहानू जिवतोडे, जितू पटले, प्रीती चंद्रशेखर राऊत, राजा तिवारी, दादा मसराम, अमित राठी, सोनू सिंह, भारत गायधने, प्रमोद दुबे, गजेंद्र खोबे, कैलाश गिरी, अनिल चानपूरकर, पंकज गजबे, कमलाकर आंदे, शरद मानकर, श्रीकांत गावंडे, सतीश रोडे, शिवम खांगार, आकाश पवार, आकाश खुरसंगे, अभिषेक खुरसंगे, अंकित चतुर, वैभव रोडे, नितेश सोनुले, शंभु पवार, वामन फुलझेले, बाबाराव डाफ, अरुण बावनकर, बाबाराव टिपले, पपिता धनोरे, पियूष बावनकर, सोनू सुरकर, प्रमोद डाखळे, मुरलीधर निघोट, जनार्दन निघोट, भारती दडमल, सतीश निघोड, महेंद्र सोनटक्के, रामदास पांडे, प्रकाश उमरेडकर, संजय लोखंडे, रवी वानखेडे, मधुकर पांडे, रवींद्र आष्टनकर, सतीश मोरे, शेखर पिसे, अशोक इटनकर, चिंतामण फटिंग, संजय चाफले, धनराज उमाळे, मिलिंद चाफले, भिमेश्वर अवचट, विनोद काकडे, आशा सेलकर, सौरभ काकडे, शुभम शंभरकर, अजय हुरपाटे, विलास कोंढाळकर, विजय जाधव, धनराज पाटील पवार, बाबा येनुरकर, जयंत दहीकर, रजनी टोंगे, जागेश्र्वर कावळे, राधिका राऊत, रवींद्र पवार, अमोल रामटेके, पनवर बावणे, मनोहर मानकर, चंदू येनुरकर, प्रणय बंड, सूरज गोतमारे, किशोर बीडवाईक, बाळू माळोदे, हरिभाऊ नाईक, पंकज गौर, दिनेश कोडापे, संजय झलके, निलेश नागोडे, ओमराज शर्मा, गजानन आकोने, राजेश मेश्राम, चिरकूट मेश्राम आदी प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आ. समीर मेघे यांच्या संवाद यात्रेमुळे कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकांमध्ये उत्साह द्विगुणित होत असल्याचे दिसून आले.