Accident : संजय राठोड यांच्या कारचा भीषण अपघात!

0

Maharashtra government cabinet minister Sanjay Rathod’s vehicle met with an accident on the Digras-Arni road. The incident occurred at 2 am, minister Sanjay Rathod is completely safe: Sanjay Rathod’s office.

जलसंधारण मंत्री तथा यमतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. अपघातानंतर गाडीतील एअरबॅग्ज खुल्या झाल्यामुळे संजय राठोड सुदैवाने बचावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दिग्रस जवळील कोपरा येथे हा अपघात घडला आहे. राठोड यांच्या वाहनाने समोरच्या पिकअपला जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे.

संजय राठोड 3 ऑक्टोबर रोजी यवतमाळच्या दौऱ्यावर होते. रात्री प्रवास करत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. त्यांच्या वाहनाने समोरच्या पिकअपला जोरदार धडक दिली. त्यामुळे गाडीच्या समोरच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर लगेच गाडीतील एअरबॅग्ज उघडल्या गेल्या. त्यामुळे सुदैवाने संजय राठोड बचावले आहेत. या अपघातात पिकअपचा ड्रायव्हर मात्र जखमी झाला आहे.