समृद्धी महामार्गावरील अपघात अखेर दोषारोपपत्र दाखल

0

 

(Buldhana)बुलढाणा – समृद्धी महामार्गवर नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हलच्या बसला ३० जूनच्या मध्यरात्रीनंतर भीषण अपघात झाला होता. अपघातानंतर बसने पेट घेतला. त्यामुळे 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. या अपघातात चालक-वाहकासह 8 जण गाडीच्या काचा फोडून बाहेर पडल्याने बचावले होते. सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळखुटा गावालगत झालेला हा अपघात समृद्धीवरील आजवरचा सर्वात भीषण अपघात ठरला आहे. या प्रकरणी सिंदखेडराजा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी नियमित व तांत्रिक तपास करून आरोपी बस चालक शेख दानिश शेख इस्त्राईल (रा. दारव्हा, जि. यवतमाळ) हा अपघातानंतर तुरुंगातचं (एमसीआरवर) असल्याने त्यांच्याविरुद्ध तीन महिन्यातचं न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणे, बंधनकारक होते. त्यामुळे त्यांनी तपास करून परिवहन विभाग, प्रयोगशाळेचे अहवाल संकलन केले. यानंतर चालकाविरुद्ध सिंदखेडराजा न्यायालयात प्रकरण दाखल केले आहे. बसच्या फरार मालक प्रगती दरणे यांना अटक करण्यात आली, त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. हे प्रकरण आता मेहकर जिल्हा व सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आले आहे.

त्यामुळे या 2024 वर्षातचं सुनावणी होऊन वारसांना न्याय मिळण्याची शक्यता असल्याचे सुनील कडासने, जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांनी स्पष्ट केले.