अपघातात लग्न वऱ्हाडातील ६ मृत्यूमुखी

0

नागपूर NAGPUR  -नागपूर ग्रामीणध्ये काटोलमध्ये क्वॉलीस आणि ट्रकचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात काटोल तालुक्यातील सोनखांब आणि ताराबोडी दरम्यान घडला. (Accident in Nagpur District) नागपुरात एक लग्नसमारंभ आटोपून वऱ्हाड काटोलच्या दिशेने परतत होते. जखमीला नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयातीव ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, काटोल तालुक्यातील मेंढेपठार येथील गावातील लोक गावातीलच चंद्रशेखर चिखले यांच्या मुलीच्या लग्नासाठी नागपुरात आले होते. क्वालिस गाडी नागपूरवरून काटोलच्या दिशेने जात असताना ती एका ट्रकवर धडकली. यात क्वालिसमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. अपघात इतका भीषण होता की यात कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. या अपघातात मयूर इंगळे (२२), वैभव चिखले (३२), सुधाकर मानकर (४२), विठ्ठल थोटे (४५), अजय चिखले (४०) व रमेश हेलोंडे यांचा मृत्यू झाला. जगदीश ढोणे यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.