शैक्षणिक-उद्योग संवाद ज्ञानाची दरी मिटवतो 

0

नागपूर(Nagpur), 24 मे 2024 शिक्षण आणि उद्योग यांच्यातील दरी कमी करण्याचे काम शैक्षणिक-उद्योग संवाद कार्यक्रम करेल. नवीन शैक्षणिक धोरणाच्या इंटर्नशिप फ्रेमवर्कशी सुसंगत असलेल्या या संवाद कार्यक्रमाचे उद्दीष्ट विद्यार्थ्यांना वास्तविक जगातील उद्योग पद्धतींची ओळख करून देणे आहे, असे मत सॉफ्टसेन्‍स टेक्नोसर्व्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक डॉ. विशाल लिचडे म्‍हणाले.

सॉफ्टसेन्‍स टेक्नोसर्व्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्‍या सायबर रेंज लॅबमध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या शैक्षणिक-उद्योग संवाद कार्यक्रमात सीआयबीएमआरडी, धनवटे नॅशनल कॉलेज, आंबेडकर कॉलेज, भिवापूर महाविद्यालय, रेवनाथ चवरे कॉलेज, सावनेर, आकार इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अशा नामांकित शैक्षणिक संस्थांसह विविध उद्योगांतील प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. यावेळी टॅली (टीईपीएल, बेंगळुरू) चे प्रादेशिक व्यवस्थापक समीर तगारे यांची विशेष उपस्‍थ‍िती होती. समीर तगारे यांनी या उपक्रमाच्‍या यशस्‍वीतेबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच, शिक्षण आणि उद्योग यांच्यातील सहकार्याचे परस्पर फायदे अधोरेखित केले.