

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन
नागपूर (Nagpur) :- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांताचे ५३ वे प्रांत अधिवेशन दिनांक २८ ते ३० जानेवारी २०२५ या दरम्यान नागपूर येथे संपन्न होणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती अभाविप प्रदेश मंत्री कु. पायल किनाके यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना दिली. यावेळी नागपूर महानगर अध्यक्ष डॉ. अभय मुदगल, महानगर मंत्री कु. दुर्गा भोयर, प्रांत मिडिया संयोजक अबुजर हुसैन उपस्थित होते.
स्मृति मंदिर परिसर, रेशीमबाग मैदान नागपूर येथे होणारे हे अधिवेशन विदर्भ प्रदेशाच्या युवा तरूणाईला नवी उर्जा व दिशा देणारे ठरेल. या अधिवेशनात विदर्भाच्या १२० तालुके व ११९ मोठे सेंटरवरून एकूण असे २३९ स्थानांवरून ५५० महाविद्यालयातून २००० विद्यार्थी प्रतिनिधी या अधिवेशनात सहभाग घेणार आहेत. नागपूरातील पावनभूमिवर तब्बल १३ वर्षानंतर विदर्भ प्रांताचे अधिवेशन होत आहे आणि विदर्भाच्या इतिहासात हे सर्वात मोठे अधिवेशन नागपूरात होणार आहेत. ( Akhil Bharatiya Vidyarthi Parishad) त्यामुळे हे अधिवेशन विदर्भ प्रांताचे रैतिहासिक अधिवेशन ठरणार आहेत.
चार दिवसीय या अधिवेशनाचे मुख्य सभागृहाला स्व. सैदाजी रेड्डी सभागृह असे नाव देण्यात आले आहे आणि या अधिवेशन परिसरात कमीत कमी प्लॅस्टीकचा वापर कसा होईल असे प्रयत्न सर्व व्यवस्थेतील कार्यकर्ता करीत आहेत. या संपूर्ण अधिवेशनात Zero Food Waste ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.
पायल किनाके म्हणाल्या की, सोमवारी सायंकाळी ५. ३० वाजता प्रदर्शनी उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे. या प्रदर्शनीला स्व. गुरूदेवजी सोरदे यांचे नाव देण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. तर मुख्य अतिथी म्हणून दक्षिण नागपूर विधानसभेचे आमदार मा. श्री. मोहन मते आणि आदित्य अनघा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव सोसायटीचे संस्थापक मा.सौ. अनघा समीर सराफ उपस्थित राहणार आहे.
या अधिवेशनाचे उद्घाटन दिनांक २८ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सोलार इंडस्ट्रीज नागपूर चे संस्थापक मा.श्री. सत्यनारायण नुवाल आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संघटनमंत्री श्री. आशिष चौहान उपस्थित राहणार आहे.
२८ जानेवारी उद्घाटन नंतर सायंकाळी ८.३० वाजता विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्राला Real Life Roll Models असे नाव देण्यात आले आहे. या सत्राला मुख्य अतिथी म्हणून भारत सरकारचे केंद्रिय मंत्री श्री. नितीन गडकरी उपस्थित राहणार आहे.
दिनांक २९ जानेवारी २०२५ बुधवार रोजी दुपारी ४.३० वाजता शहरातून शोभायात्रा काढली जाणार. ही यात्रा केशवद्वारमार्गे, सक्करदरा चौक तेथून भांडे प्लॉट चौक या मार्गाने जाणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता तिरंगा चौक येथे जाहिर सभेने शोभायात्रेचा समारोप होणार. अभाविप चे राष्ट्रीय मंत्री श्री. श्रवण बी. राज व छात्रनेते या सभेला संबोधित करणार.
या अधिवेशनात विविध प्रकारचे भाषण सत्र होणार आहे. यावर्षी अहिल्याबाई होळकर यांचे त्रिशताब्दी वर्ष असल्यामुळे हया संपूर्ण अधिवेशन परिसराला पूण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नगर असे नाव देण्यात आले आहेत.
या अधिवेशनात शैक्षणिक, सामाजिक व विदर्भाचा विकास या विषयांवर प्रस्ताव पारित करण्यात येणार आहे. तसेच अधिवेशनाच्या शेवटी येणा-या वर्षभराची विद्यार्थी परिषदेची आगामी दिशा प्रांत मंत्री मांडतील व समारोप प्रसंगी अभाविप विदर्भ प्रांत कार्यकारिणी घोषणा प्रांत अध्यक्ष करतील.
२९ जानेवारी २०२५ ला होणा-या शोभायात्रेसाठी नागपूराच्या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन अभाविप प्रांत मंत्री कु. पायल किनाके, महानगर अध्यक्ष डॉ. अभय मुदगल व महानगर मंत्री कु. दुर्गा भोयर, अबुजर हुसैन यांनी केले.
चार दिवस चालणा-या अधिवेशनासाठी येणा-या सर्व विद्यार्थी प्रतिनिधींचे उत्साहपूर्वक स्वागत करावे व या अधिवेशनात सहभाग घ्यावा असे आवाहन नागपूर महानगर अध्यक्ष डॉ. अभय मुदगल यांनी नागपूरातील नागरिकांना केले.