

Nagpur नागपूर, 8 डिसेंबर
भाजपा नागपूर महानगरच्या विविध आघाडीच्या अध्यक्षांची यादी महानगर अध्यक्ष बंटी कुकडे यांनी जाहीर केली असून त्यातील सांस्कृतिक आघाडीच्या अध्यक्षपदी तरुण व तडफदार कार्यकर्ते अभिजीत मुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
( Abhijeet Mule)अभिजीत मुळे हे गेल्या 22 वर्षांपासून नाट्यक्षेत्रात कार्यरत आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या कार्यशाळेतून घडलेल्या अभिजीत मुळे यांनी अनेक नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन केले. त्यांना अनेक पुरस्कारदेखील प्राप्त झाले आहेत. अनेक लोकप्रिय चित्रपटांचे सहदिग्दर्शक, कास्टिंग दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
अभ्युदय ग्लोबल व्हिलेज स्कूल, बावनगाव येथे सध्या ते नाट्य व चित्रपट विभागात शिक्षक म्हणून कार्यरत असून शेतकऱ्यांच्या मुलांचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी काम करीत आहेत. अतिशय उत्साही आणि धडाडीचे कार्यकर्ते असलेल्या अभिजीत मुळे यांनी या निवडीचे श्रेय (Union Minister Nitin Gadkari)केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, (Deputy Chief Minister Devendra Fadnavis)उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Bunty Kukade)बंटी कुकडे, (Sanjay Bhende)संजय भेंडे, (Upendra Kothekar)उपेंद्र कोठेकर, ( Mohan Mate)मोहन मते, (Praveen Datke)प्रवीण दटके,(Vishnu Changde) विष्णू चांगदे, (Divya Deepak Dhurde)दिव्या दीपक धुरडे, (Shivani Dani)शिवाणी दाणी व (Kalyan Deshpande)कल्याण देशपांडे यांना दिले आहे.