इयत्ता ५ वीतील ध्रुव ग्लोबल स्कूलचा आरुष सराफ राज्यात प्रथम

0

राज्य शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर

पुणे (Pune) :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता ५ वी) शिष्यवृत्ती परीक्षांचा अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. या निकालात पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) मध्ये संगमनेर येथील ध्रुव ग्लोबल स्कूलचा विद्यार्थी आरुष केदार सराफ याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याने 95.97 टक्के गुण मिळवून हे घवघवीत यश संपादन केले आहे.

आरुषचे वडील डॉ. केदार सराफ आणि आई डॉ. अनुजा सराफ हे दोघेही वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. ही शिष्यवृत्ती परीक्षा (Scholarship Exam) ९ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात आली होती.आरुषच्या या उज्ज्वल यशाबद्दल शाळा, शिक्षक, पालक आणि परिसरात त्याचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.