


अमरावती (Amravati):आज लोकसभा निवडणुकीत मतदानातून देशात एक क्रांती घडेल असा दावा प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी मतदानानंतर माध्यमांशी बोलताना केला आहे. गेल्या वीस वर्षांपासून आम्ही शेतकरी शेतमजुरांसाठी लढत आहोत.मला एकच अपेक्षा आहे मतदारांकडून की, ही लढाई आम्ही शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, कष्टकरी यांच्यासाठी लढत आहोत. तर त्यांनी ही निवडणूक आम्हाला जिंकून द्यावी. निश्चितच ही निवडणूक शेतकरी, शेतमजूर हे आम्हाला जिंकून दिल्याशिवाय राहणार नाहीत ,आजच्या मतदानामुळे या देशात एक क्रांती घडेल. जाती धर्माच्या नावावर नाही तर शेतकरी शेतमजुरांच्या नावावर ही निवडणूक आगळीवेगळी ठरेल असेही बच्चू कडू म्हणाले.
Related posts:
३५ वी वरिष्ठ राष्ट्रिय सेपकटकरॉ स्पर्धा करिता अवधेश क्रिडा मंडळाच्या प्रांगणावर शिबीराचे आयोजन
October 16, 2025LOCAL NEWS
वेकोलि में कोल इंडिया अंतर कंपनी पॉवरलिफ़्टिंग, वेटलिफ्टिंग एवं बॉडीबिल्डिंग प्रतियोगिता 2025-26 संप...
October 16, 2025MAHARASHTRA
सोबत पालकत्व प्रकल्पा'चा दिवाळी मिलन सोहळा आज
October 16, 2025Social