मेैत्रिणीला मेसेज केल्याच्या वादातून युवकाचा खून

0

(Nagpur)नागपूर : मैत्रिणीला इन्स्टाग्रामवर मेसेज केल्यामुळे झालेल्या वादातून एका युवकाचा दिवसाढवळ्या खून करण्यात आल्याची घटना नागपुरात (Jaripataka )जरीपटका पोलिस हद्दीतीील रिपब्लिकन नगरमध्ये काल गुरुवारी घडली. या घटनेत ठार झालेल्या युवकाचे नाव (Shreyans Patil)श्रेयांस पाटील असे असून आरोपीचे नाव (Amit Meshram)अमित मेश्राम असे आहे. लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्राने तरुणाची हत्या करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी अमित व त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.

जरीपटका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमित मेश्राम आणि श्रेयांश पाटील दोघांची एका युवतीसोबत मैत्री होती. घटनेचा सूत्रधार अमित मेश्रामने काही दिवसांपूर्वी श्रेयांशच्या मैत्रिणीला इन्स्टाग्रामवर स्तुती करणारे मेसेज पाठवले होते. त्यामुळे श्रेयांश संतप्त झाला होता. त्याने अमितला इन्स्टाग्रामवर मेसेज करुन त्याच्या मैत्रिणीला यापुढे मेसेज न करण्याची धमकीच दिली होती. तेव्हापासून दोघांमध्ये वाद सुरुच होता. गुरुवारी अमित व दोन विधीसंघर्षग्रस्त मुले श्रेयांशच्या घरी आली. त्याला चर्चा करण्यासाठी बौद्ध विहाराजवळ चलण्यास सांगण्यात आले. श्रेयांसही सोबत चाकू घेऊन होता. बौद्ध विहाराजवळ श्रेयांशची आरोपींसोबत हाणामारी झाली. आरोपींनी त्याच्यावर रॉडने हल्ला करीत त्याच्याजवळील चाकू हिसकावून घेतला व त्याच्यावर चाकूचे वार केले. श्रेयांसला गंभीर जखमी करुन तिथून आरोपी फरार झाले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी काही तासात अमित मेश्रामसह एकूण तीन आरोपींना अटक केली. आरोपींमधील दोन जण अल्पवयीन आहेत. या प्रकरणाचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तपास केला जात होता.