

नागपूर (Nagpur): कुटुंबियांसोबत वाढदिवस साजरा केल्यानंतर मित्राला रात्रीला पार्टी देण्यासाठी घरच्यांची नजर चुकवून तो बाहेर पडला मात्र त्याला पार्टी द्यायसाठी मध्यरात्री एकही दुकान उघडे नव्हते.अशात तो मित्राला घेऊन अंबाझरी तलावावर गेला. आणि काही वेळ तिथे टाइमपास केल्यानंतर पब्जी खेळत बसला.
नागपूर येथील पोह्याची दुकान पहाटे चार वाजेपासून सुरू होतात हे त्याला माहीत होते. तो पोहे वाल्याच्या दुकानाकडे यायला निघाला. अशातच त्याचा pubg खेळताना त्याचं लक्ष नसल्याने त्याचा पाय खड्ड्यात गेला.आणि थोड्याच वेळात त्याचा मृत्यू झाला. पुलकित राज शहदादपुरी (१६) असे मृत युवकाचे नाव आहे.
त्याचा मित्र ऋषिकेश मोबाईलचा प्रकाशात खड्डा ओलांडून पुढे निघाला. त्याच्या मागे पुलकित होता. मात्र, पुलकित मोबाईलवर पब्जी खेळण्यात व्यस्त होता. त्याला खड्डा दिसलाच नाही. त्यामुळे तो १५ फूट खड्ड्यात पडला. ऋषीला आवाज येताच त्याने मागे वळून बघितले असता पुलकित दिसला नाही. त्याने आरडाओरड केली. कुटुंबीय तसेच पोलिसांना माहिती दिली. अंबाझरी पोलिसांनी घटनास्थळ गाठले.
अग्निशमन जवानांच्या मदतीने पुलकितचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. शवविच्छेदनानंतर पार्थिव कुटुंबीयांच्या सुपूर्द करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.तो 11 अकराव्या वर्गात शिकत होता.