घोषणा देत तरुणाची मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी

0

मोठी बातमी समोर येत आहे, आंदोलक तरुणानं मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली, मात्र तो संरक्षक जाळीत अडकल्यानं मोठा अनर्थ टळला आहे.

मोठी बातमी समोर येत आहे. पुन्हा एकदा एका तरुणानं मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याने मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली आहे. सुदैवानं तो मंत्रालयात लावण्यात आलेल्या सुरक्षा जाळीत अडकल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. या तरुणाचा जीव वाचला आहे. अंदाजे 40 ते 45 वर्षांच्या आसपास या तरुणाचं वय आहे. तरुणानं मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. त्यानंतर तो तिथे लावण्यात आलेल्या संरक्षण जाळीत अडकला, या घटनेनं एकच धावपळ उडाली. तिथे उपस्थित असलेले पोलीस या तरुणाला जाळीतून बाहेर काढण्यासाठी धावले.

समोर आलेल्या माहितीनुसार या तरुणाचं महसूल विभागात काम होतं. मात्र आपलं काम होत नसल्यानं वैतागलेल्या या तरुणानं इंकलाब जिंदाबादच्या घोषणा देत मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. जागा शिल्लक वारे महसूल खाते, अशा अशायाच पत्र त्याने लिहलं होतं. जागेच्या संदर्भात न्याय मिळाला नाही म्हणून त्याने उडी मारली. मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर त्याने उडी मारली. त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.

पोलिसांनी संरक्षक जाळीवर उतरून या तरुणाला ताब्यात घेतलं. या प्रकारामुळे मंत्रालयात एकच गोंधळ उडाला. या तरुणाचं महसूल विभागामध्ये काम होतं, मात्र काम होत नसल्यानं त्याने मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली आहे. या तरुणाचं नाव अद्याप समोर आलेलं नाही. दरम्यान हा तरुण जखमी झाला असावा अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. त्याने जेव्हा संरक्षक जाळीवर उडी मारली, तेव्हा तो तिथेच आपलं पोट धरून तसाच बसला होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

उड्या मारण्याचे वाढले प्रकार

दरम्यान अलिकडच्या काळात अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, यापूर्वी देखील काही जणांनी मंत्रालयातून उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता मंत्रालयात संरक्षक जाळी बसवण्यात आली आहे. पोलिसांकडून देखील मंत्रालयात येणाऱ्या व्यक्तींची कसून चौकशी होते. मात्र एवढ सगळं होऊन देखील या तरुणांन मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून आज उडी मारल्याचा प्रकार घडला आहे.